जुन्नर | Junnar

पुणे जिल्ह्यातील एक पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ. महाराष्ट्रातील प्राचीन राजवंश सातवाहन यांच्या काळातील एक मुख्य ठिकाण, तसेच छ. शिवाजी महाराज यांचे जुन्नरजवळील शिवनेरी येथील जन्मस्थळ यांमुळे जुन्नर हे स्थळ प्रसिद्ध आहे. मानवी वास्तव्याचे पुरावे या परिसरात अश्मयुगापासून (बोरी) प्राप्त होतात. जुन्नर परिसरातील अग्निजन्य खडकात इ. स. पू. पहिल्या शतकात खोदलेली हीनयान पंथाची साधारणतः […]

नवनाथ | Navanatha

नाथ संप्रदायातील प्रसिद्ध नऊ नाथ-योगी. नवनाथांच्या सर्व सूचींमध्ये एकवाक्यता नाही. नवनाथ विषयावरील ग्रंथांमध्ये नऊ नावे सर्वच ठिकाणी एकसारखी येत नाहीत. तेव्हा अमुकच नऊ नाथ आद्य नाथसिद्धांपैकी प्रमुख होते, असे दिसून येत नाही. निरनिराळ्या परंपरांत स्थानिक महत्त्वानुसार व कमी-जास्त आदरभावनेनुसार या गणना झाल्या असाव्यात, असे रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. असे असले तरी, नवनाथांच्या विभिन्न […]

सोनारी | Sonari

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी, तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे. ‘सोनारी’ या नावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासुर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘सुवर्णपूर’ पडले. पुढे सुवर्णपूर […]

राघोजी भांगरे | Raghoji Bhangare

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्‍हारच्‍या मुकणे संस्‍थानच्‍या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्‍यवस्‍था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, […]

चामर (चांभार) लेणी | Chamar Leni

महाराष्ट्रातील एक हिंदू लेणी. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहरालगत प्रामुख्याने दोन ठिकाणी लेणी खोदण्यात आली आहेत. यांपैकी शहराच्या पश्चिमेस असणारी लेणी ‘धाराशिव लेणी’ म्हणून ओळखली जातात, तर भोगावती नदीजवळील एका टेकडीवर खोदलेली लेणी, ‘चामर’ किंवा ‘चांभार’ लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. जेम्स बर्जेस या एका स्कॉटिश पुरातत्त्वज्ञाने तत्कालीन धाराशिव परिसराचे सर्वप्रथम सखोल सर्वेक्षण केले (१८७५). त्यांनी […]

सावळदा संस्कृती

सावळदा संस्कृती : (इ. स. पू. २५००–२०००). महाराष्ट्रातील आद्य शेतकर्‍यांची एक सर्वांत जुनी संस्कृती. इ. स. पू. २५०० च्या सुमारास ह्या संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम नंदुरबार (पूर्वीचा धुळे) जिल्ह्यातील सावळदा या ठिकाणी लागला. या गावाच्या नावावरूनच या संस्कृतीला ‘सावळदाʼ असे नाव देण्यात आले. तापी नदीच्या खोऱ्यातील सावळदा, कवठे व प्रवरा नदीच्या खोऱ्यातील दायमाबाद […]

पंढरपूरचा तह

पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२). पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील तह. महाराष्ट्रात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे-जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली. यासाठी दुसरा बाजीराव व दक्षिणेकडील सरदार हे सारखेच जबाबदार होते. यांमध्ये पटवर्धन, पानसे, रास्ते, गोखले, निपाणीकर-देसाई, कित्तूरकर देसाई आदी जहागीरदारांचा समावेश होता. या संघर्षातूनच पुढे पंढरपूरचा तह घडून आला. कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या […]

वाकाव | Wakav

वाकाव | Wakav – महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीच्या डाव्या तीरापासून १५० मी. अंतरावर आहे. भीमा-सीना नद्यांच्या प्रदेशांत पुरातत्त्वीय स्थळांचे सर्वेक्षण करत असताना प्रमोद जोगळेकर आणि संतोष हंपे यांनी या स्थळाची नोंद केली (२००१-०२). तेथे एक यादव काळातील (हेमाडपंती) मंदिर असून सर्वेक्षणादरम्यान मंदिराच्या आवारामध्ये […]

डच-मराठे संबंध

डच-मराठे संबंध – डच-मराठे संबंध : (१६६०-१६८०). छ. शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि परकीय व्यापारी डच यांच्यातील परस्परसंबंध. येथे तंजावरच्या मराठी राज्याचा विचार केलेला नाही. ऐतिहासिक डच साधनांमधील छ. शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम ज्ञात उल्लेख हा ५ मे १६६० रोजीच्या एका पत्रातील असून अफजलखान प्रकरणाशी संबंधित आहे. १६६३ साली छ. शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकणच्या स्वारी […]

केळशी | Kelshi

केळशी | Kelshi – रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी १५० मी. पूर्वेला वर्तमान पुळणीच्या मागे आहे. सागरी लाटांशी या जुन्या वालुधन्वाचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे. या जुन्या वालुधन्वाचा आकार त्रिकोणी असून उत्तर-दक्षिण लांबी ५६० मी., सरासरी उंची १८ मी. तर […]

मनसर | Mansar

मनसर | Mansar – विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या […]

दाभोळ | Dabhol

दाभोळ | Dabhol – महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले आहेत. दाभोळ हे चौदाव्या-पंधराव्या शतकापासून पर्शियन आखात व भूमध्य सागराच्या परिसरातील बंदरांशी व्यापारासाठी वापरात होते. दाभोळ बंदराच्या सुरक्षिततेसाठी किल्ला बांधला गेला होता. या किल्ल्याचे अवशेष चंडीकादेवी मंदिराजवळ आहेत. विजापूरच्या अदिलशाही कालखंडात […]