अष्टविनायक

गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे, ज्याला अष्टविनायक म्हणलं जातं. श्रीगणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती पाहायला मिळतात. इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत. मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात […]
होळीला शेणाच्या गोवऱ्या जाळण्यामागे काय आहे धार्मिक कारण ?
होळीचा सण जवळ आल्याने सगळ्यांचा उत्सार वाढला आहे. फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिरण्यकश्यपू त्याचा मुलगा प्रल्हाद याच्या विष्णूभक्तीमुळे त्रस्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला मारण्याची जबाबदारी त्याची बहीण होलिकेला दिली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीमध्ये बसली. भगवान विष्णूने आगीतून प्रल्हादाला वाचवले. पण होलिकेचे दहन झाले. […]
काय आहे शिमगा सणाचे महत्त्व?
कोकणात शिमगा (Shimga) या नावाने ओळखला जाणारा होळी (Holi) हा कोकणातील सर्वात प्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन मासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी होळी पेटवून, तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून त्यात नारळाची आहुती देण्याची प्रथा आहे. तसेच पेटवलेल्या होळीला एकत्रित गलका करत हा सण साजरा केला जातो. […]
ज्योतिर्लिंग | Jyotirlinga
ज्योतिर्लिंग : भारतातील प्रख्यात बारा शिवस्थाने ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखली जातात. ह्या बारा ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपाबाबत व उत्पत्तीबाबत अभ्यासकांत विविध मते आढळतात. ज्योतिर्लिंगांतील शाळुंका ह्या यज्ञवेदींची आणि लिंगे ही यज्ञशिखांची प्रतीके बारा आदित्यांची प्रतीके एकाच शिवलिंगाचे बारा विविध ठिकाणी पडलेले खंड व्यापक ब्रह्मात्मलिंग किंवा व्यापक प्रकाश सुप्तावस्थेत असलेली ज्वालामुखीची उद्रेकस्थाने इ. उपपत्ती अभ्यासकांनी ज्योतिर्लिंगांबाबत मांडलेल्या आहेत. ह्या […]
त्रिमूर्ति | Trimurti
त्रिमूर्ति : तीन देवतांच्या संयुक्त प्रतीकात्मक आविष्कारास ही संज्ञा लावली जाते. हिंदू व बौद्ध धर्मांत ही त्रिमूर्तिकल्पना आढळते. ख्रिस्ती धर्मातील ⇨ट्रिनिटीची कल्पना मात्र या त्रिमूर्तिकल्पनेहून भिन्न आहे. ट्रिनिटीच्या कल्पनेत पिता, पुत्र व होली स्पिरिट (घोस्ट) मिळून एकच देव मानला आहे. बौद्ध धर्मातील महायान पंथात मंजुश्री, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांची त्रिमूर्ती मानलेली आहे. त्रिमूर्तिकल्पनेचे बीज वेदांतही […]
लेणी | Cave

लेणी : पर्वतश्रेणीत खडक खोदून तयार केलेली गुहागृहे वा प्रस्तरालये. नासिकजवळच्या पांडव लेण्यातील लेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति…, ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. लेण्यांना ⇨गुहा, गुंफा, शैलगृहे, शिलामंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावेही आहेत. गुहांची ठिकाणे डोंगरकपारीत नैसर्गिक रीत्या तयार झालेली […]
वेरूळ | Verul | Ellora
वेरूळ : लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान […]
वाकाटक घराणे | Vakataka family
वाकाटक घराणे : महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी […]
वारकरी संप्रदाय | Warkari Sampraday
वारकरी संप्रदाय : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. ‘वारी करणारा’ ह्या अर्थाने ‘वारकरी’ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ‘वारी’ ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो ‘वारकरी’ असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे, तीही […]
वारली | Warali Jamaat
वारली : भारतातील एक अनुसूचित जमात. वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नासिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. एकूण लोकसंख्या सु. ५,६७,०९३ (१९८१) एवढी होती. वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता […]
वासुदेव | Vasudev
वासुदेव : महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जात. वृत्तीने हे धार्मिक भिक्षेकरी आहेत. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि ह्या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली, असे ह्या जातीचे लोक सांगतात. मराठा कुणब्यांप्रमाणे त्यांचे रीतिरिवाज आहेत. भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करतात आणि घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते. काही वासुदेव […]
विदर्भ | Vidarbha
विदर्भ : महाराष्ट्र राज्यातील एक भौगोलिक प्रदेश. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश सांप्रतच्या विदर्भात केला जातो. या भूप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश १९° ५’ ते २१° ४७’ आणि पूर्व रेखांश ७५° ५९’ ते ७९° ११’ या दरम्यान झालेला असून यातील बहुतेक भाग तापी, पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व […]