स्पतसिंधू लोक
सिंधू नदीकाठी आपली संस्कृती वसवणारे स्पतसिंधू लोक अर्थात आपण…. आपला जगाशी पहीला संबंध आला तो पारसी लोकान्मुळे. पारसी मध्ये साधारणपणे ‘स’ ला ‘ह’ म्हणले जाते. म्हणूनच ‘असुर’ ला ‘अहूर’ आणि ‘सप्ताहला’ ‘हप्ता’ म्हणले गेले आणी त्याच प्रकारे ‘सप्तसिंधू’ संस्कृती बनली ‘हप्तहींदू’, सिंधकूश पर्वत बनला हींदकूश आणि जसजसे हप्तहींदू लोक सिंधूनदीच्या सात खोर्यापासून दूर दूर जाऊन […]
काय आहे शिमगा सणाचे महत्त्व?
कोकणात शिमगा (Shimga) या नावाने ओळखला जाणारा होळी (Holi) हा कोकणातील सर्वात प्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन मासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी होळी पेटवून, तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून त्यात नारळाची आहुती देण्याची प्रथा आहे. तसेच पेटवलेल्या होळीला एकत्रित गलका करत हा सण साजरा केला जातो. […]
वाकाटक घराणे | Vakataka family
वाकाटक घराणे : महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी […]
जत्रा | Fair
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे म्हणता येईल. इस्लामधर्मीय सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त जो उत्सव होतो, त्यास उरूस वा जुलूस म्हणतात. त्या त्या देवतेविषयी किंवा तीर्थक्षेत्रांतील एक वा अनेक देवतांविषयी पूज्यभाव वा सत्पुरुषाविषयी […]
पंढरपूरचा तह
पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२). पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील तह. महाराष्ट्रात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे-जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली. यासाठी दुसरा बाजीराव व दक्षिणेकडील सरदार हे सारखेच जबाबदार होते. यांमध्ये पटवर्धन, पानसे, रास्ते, गोखले, निपाणीकर-देसाई, कित्तूरकर देसाई आदी जहागीरदारांचा समावेश होता. या संघर्षातूनच पुढे पंढरपूरचा तह घडून आला. कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या […]
डच-मराठे संबंध
डच-मराठे संबंध – डच-मराठे संबंध : (१६६०-१६८०). छ. शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि परकीय व्यापारी डच यांच्यातील परस्परसंबंध. येथे तंजावरच्या मराठी राज्याचा विचार केलेला नाही. ऐतिहासिक डच साधनांमधील छ. शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम ज्ञात उल्लेख हा ५ मे १६६० रोजीच्या एका पत्रातील असून अफजलखान प्रकरणाशी संबंधित आहे. १६६३ साली छ. शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकणच्या स्वारी […]
सिंधू संस्कृती
परिचय- भारताच्या इतिहासाची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून होते ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखतो. ही सभ्यता दक्षिण आशियाच्या पश्चिम भागात सुमारे 2500 AD मध्ये पसरली, जी सध्या पाकिस्तान आणि पश्चिम भारत म्हणून ओळखली जाते. इजिप्त, मेसोपोटेमिया, भारत आणि चीन या चार सर्वात मोठ्या प्राचीन नागरी संस्कृतींपेक्षा सिंधू संस्कृती अधिक प्रगत होती. 1920 मध्ये, भारताच्या पुरातत्व खात्याने […]
राष्ट्रकूट | राष्ट्रकूट कोण होते?

राष्ट्रकूट कोण होते? राष्ट्रकूट साम्राज्याने 10 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत सुमारे 200 वर्षे दख्खनवर वर्चस्व गाजवले आणि विविध वेळी उत्तर आणि दक्षिण भारताच्या क्षेत्रांवर नियंत्रण ठेवले. ती केवळ त्या काळातील सर्वात शक्तिशाली राजकीय अस्तित्वच नव्हती तर आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये पूल म्हणूनही काम केले. याने दक्षिण भारतात उत्तर भारतीय परंपरा आणि धोरणांचा […]
पाल कोण होते? पाल घराणे

पाल कोण होते? पाल साम्राज्याची स्थापना गोपालने 750 मध्ये केली असावी. पाल घराण्याने 8 व्या ते 12 व्या शतकापर्यंत राज्य केले. भाषा: संस्कृत, प्राकृत आणि पाली. “पाल” हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “संरक्षक” आहे. हे सम्राटांच्या नावांसह एकत्र केले गेले, परिणामी साम्राज्याचे नाव “पाल” झाले. पाल हे महायान बौद्ध धर्माचे कट्टर समर्थक होते. त्याच्या राजवटीत […]
नाग पंचमी, कला आणि सांस्कृतिक संदर्भ

नाग पंचमी, कला आणि सांस्कृतिक संदर्भ – भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका […]