रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या विरहाने व्याकुळ होते. तेव्हा पार्वतीने सीतेचे रूप घेऊन, ती त्याच्यासमोर प्रकट झाली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीला ओळखले आणि, ‘ये माई’ ‘ असे म्हणून नमस्कार केला.
त्यावरून यमाई हे नाव प्रचलित झाले. यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर साताऱ्याजवळच्या औंध येथे आहे.

या देवीच्या नावाच्या उत्पत्ती बद्दल अशी आख्यायिका सांगितले जाते कि, श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले. तेव्हा श्रीराम बंधू लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधात भटकत असताना, देवी पार्वतीने श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले व ती रामासमोर प्रकट झाली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीस “तू का आई’ म्हणजेच “तू इथे का” असा प्रश्न विचारला. त्यावरून या देवीस #तुकाई हे नाव मिळाले. तुकाई देवीचे मूळ स्थान तुळजापूर जवळच्या घाटशिला येथे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *