जे आहे ते आहे…
आयुष्य प्रत्येक वेळी काहीतरी आपल्याला नवीन देत असते आणि त्याबदल्यात खूप काही वापस घेत देखील असते…
ज्याला हे गणित कळलं त्यालाच काय ते बाबा हे सगळ जमलं…
नाविन्याच्या सुखद सुरुवातीला सार काही चांगलं वाटतं,
काही दिवस गेल्यानंतर मात्र आपले जे जुनं होत तेच हायस वाटतं…
आयुष्यात प्रत्येकाची स्वप्न असतात खूप मोठी मोठी,
मात्र या धावपळीत साऱ्या खायची राहून जाते हो, साधी रोटी…
नुसता बिझी, नुसता काम, आजकाल साऱ्या जगाला फुटलाय एकलकोंडेपणाचा घाम…
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त . … हे हव ते हव् असे आजकाल येतात बरेच जोक्स,
पण तरीही शुल्लक कारणावरून आजकाल जीव घ्यायला उठले आहेत हे सारे लोकस्,…
कोणी जाती पातीत खेळत बसलाय, तर कोणी वासनेच्या अंतरंगात लोळत बसलाय…
तरीही,
सरलेले आयुष्य आपण चांगलं जगावं असे अनेकांना वाटतं,
काहीं केल्या भूतकाळाचे भूत आपसूकच यांच्या मानगुटीवर येऊन बसतं…
माझा लिहायचा उद्देश असा काही खास नव्हता, तरीही लिहीत गेलो आणि वाटले कधीतरी माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता…