गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प –

गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प चीन मध्ये आहे असे म्हटले जाते परंतु मुंबई मधील चोर बाजारात सापडलेले हे नाणे इसैवी सन चौथ्या ते पाचव्या शतकातील असावे या नाण्याच्या पाठी धम्मलिपी अंकित लेख आहे ज्यावर बैलाचे शिल्प आहे. त्याखाली  जा ग (इ) श्व र असे लिहलेले आहे. हे नाणे डॉ. कोठारी यांनी मुंबईच्या चोर बाजारात सापडले होते.  इथे असलेली गणेश शिल्प हे इसवी सन चौथ्या शतकातील असावे व हा काल गुप्त कालीन असावे. चीन मध्ये इसवी सन सहाव्या शतकातील गणेश मूर्ती आहे. एकूणच गमतीशीर इतिहास आहे. या नाण्यामुळे गणपती बौद्ध लोकांचा की जैन की वैदिक लोकांचा ह्या गोष्टींमध्ये जबरदस्त गोंधळ निर्माण होतो.

सध्याचे बौद्ध  हिंदू धर्माला टीका करण्यासाठी आता भेसळ झालेला बौद्ध धर्म स्वीकारू लागलेत. बाबासाहेब यांनी शुद्ध करून दिला तरी आता ही भेसळ पुन्हा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना एकच सांगणे आहे की गणपती ला गणपती च राहू द्या कोणी अशोक हाच गणपती म्हणतो कोणी बुध्द हाच गणपती आहे तर कोणी सुद्धोधन हा गणपती म्हणतो हे असले जावई शोध लावण्यापेक्षा बुध्द शिकवण आचरणात आणण्याची पद्धत का शिकत नाहीत. नुसती टीका करण्यात वेळ कशाला घालवता.

गणपती ही वैश्विक देवता म्हणून ६ व्या शतकात विकसित झालेली पाहायला मिळते. अश्यावेळी ती आमच्याकडून च गेली हा अट्टाहास योग्य राहणार नाही.

मुळात गणपती ही देवता अनेकांनी महान देवता भाग्याची देवता म्हणून बौद्ध राष्ट्रांनी देखील स्वीकारली आहे यात च समजून जा की ही बौद्ध देवता होवूच शकत नाही कारण बौद्ध धर्मात भाग्य संकल्पनाच नाही कर्म सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गणपती ही बाहेरून बौद्ध धर्मात घुसलेली काल्पनिक देवता आहे वास्तविक तिचा बौद्ध धर्माशी फारसा महत्त्व नाही वज्रयान ने गणपती ला महत्त्व दिले ते तिबेटी लोकांनी स्वीकारले उडीसा येथील उदयगिरी व खंडगिरी लेण्यात गणेश शिल्प आहे. तसे चालुक्यांच्या बदामी लेण्यात ही गणेश आहे. खजुराहो का देखील गणपती आहे तसाच तो जपान थायलंड म्यानमार कंबोडिया  चीन सारख्या देशात ही गणपती आहे .

एकूण सांगायचे झाले तर भारतात हे नाने च गणपतीची प्राचीन मूर्ती ठरते.

Ravindra Minakshi Manohar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *