नायगाव मयूर अभयारण्य | Nayagaon Mayur Wildlife Sanctuary
मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारातील आहे. या वनात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शासनाने ८ डिसेंबर १९९४ ला हे क्षेत्र “नायगाव […]
भीमाशंकर अभयारण्य | Bhimashankar Wildlife Sanctuary
भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे. भीमाशंकरचे वन हे पाणगळ, निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत पसरलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ १३१ चौ.किमी आहे. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे ३,००० […]
फणसाड अभयारण्य | Phanasad Wildlife Sanctuary
महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ.किमी. असून हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून १२ किमी. अंतरावर आहे. हे अभयारण्य काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सर्वा, सुपेगाव अशा एकूण ३८ […]