शिवाजी विद्यापीठ | Shivaji University
शिवाजी विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. स्थापना कोल्हापूर येथे १९६२ साली. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती व तेथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. महाराष्ट्र शासनाने १९६२ साली ‘विद्यापीठ कायदा’ मंजूर करून या विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘ग्रामीण युवकांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार’ आणि ‘विज्ञान व मानव्यविद्या या क्षेत्रांतील पायाभूत […]