सोनारी | Sonari
महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी, तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे. ‘सोनारी’ या नावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासुर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘सुवर्णपूर’ पडले. पुढे सुवर्णपूर […]