जुन्नर | Junnar
पुणे जिल्ह्यातील एक पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ. महाराष्ट्रातील प्राचीन राजवंश सातवाहन यांच्या काळातील एक मुख्य ठिकाण, तसेच छ. शिवाजी महाराज यांचे जुन्नरजवळील शिवनेरी येथील जन्मस्थळ यांमुळे जुन्नर हे स्थळ प्रसिद्ध आहे. मानवी वास्तव्याचे पुरावे या परिसरात अश्मयुगापासून (बोरी) प्राप्त होतात. जुन्नर परिसरातील अग्निजन्य खडकात इ. स. पू. पहिल्या शतकात खोदलेली हीनयान पंथाची साधारणतः […]