हंपी | Hampi –

हंपी | Hampi – खरंतर हे ठिकाण म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तिथं जायचं, मज्जा करायची, खायचं, प्यायच, मनसोक्त जगायचं. आणि हो खरंच इथ गेलं की माणूस आपलं दुःख, आपली निराशा, आपले प्रॉब्लेम सगळं विसरून तिथं रमत जातो. नाही हे ना ठिकाणचं तसं आहे, अन् आता तर हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित पण केलंय. प्रत्येकानं […]
हंपी Intro 1 – साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य

हंपी : साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य – घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसले तरी गतवैभव अनुभवता नक्कीच येते आणि मन सार्थ अभिमान, खूपकाही गमावल्याची वेदना, पराभवाचे दुःख अशा संमिश्र भावनांमध्ये अडकून पडते. आज आपण जातोय तेराव्या शतकाच्या पूर्वाधात. गेली कित्येक दशके उत्तरेकडे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजांनी विस्तारवादी धोरण स्वीकारले आणि दक्षिण भारतातील राजकीय परिस्थितीत […]
शिव-पार्वती विवाह स्थान, हंपी | Virupaksha Temple, Hampi

शिव-पार्वती विवाह स्थान , विरुपाक्ष मंदिर, हंपी – हंपी मध्ये विजयनगर साम्राज्य उदयाला येण्या आगोदर शेकडो वर्षा पूर्वी , अर्थात येथील शिलालेखा नुसार ९-१० व्या शतकात बांधले गेले. या मंदिराच्या मूळे हंपी हे तिर्थक्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मंदिरा बाबत कथा अशी आहे की , देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली तिचे नाव पंपा. हंपी […]
ससिवेकलू गणेश, हंपी

ससिवेकलू गणेश, हंपी – विजयनगरच्या कलात्मक कौशल्यांचे गणेशाची ही चार हात असलेली महाकाय मूर्ती एक उदाहरणआहे. या विशाल गणेश मूर्तीस स्थानिक स्तरावर ससिवेकलू (मोहरी बीज) गणेश म्हणतात. हेमकुट टेकडीच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हा गणेश आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान गणेश (जो गणपती, विनायक , लंबोदर सह अनेक नावाने ओळखले जातो ) आपल्या अति खाण्याच्या सवयीमुळे प्रसिद्ध […]
कडालेकलू गणेश, हंपी

कडालेकलू गणेश, हंपी – हंपी हेमकुट टेकडीच्या उतारावर कडालेकलू गणेश मंदिर आहे. ही एक अखंड पाषाणातील गणेशमूर्ती आहे आणि हंपीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कडालेकलू गणेश ही हंपी मधील सर्वात मोठी मूर्ती आहे. गणेशमूर्ती उंच ०६ मीटर (१५ फूट) असून एका दगडाने कोरलेली आहे. या पुतळ्याचे पोट एक बंगाल हरभरा (कन्नडमधील कडालेकलू) सारखे आहे आणि […]
कृष्ण बाजार, हंपी

कृष्ण बाजार, हंपी – ‘कृष्ण बाजार’ हे नाव कृष्ण मंदिराशी संबंधित आहे,हंपीमधील तुलनेने नव्याने उत्खनन केलेले हे ठिकाण आहे. कृष्ण मंदिरास आवश्यक पाण्यासाठी पवित्र कुंड (पुष्करणी) देखील कृष्णा बाजारच्या शेजारीच आहे त्याला ‘कल्याणी’ असंही म्हणतात. मंदिरा समोरील हा रथमार्ग आहे. कृष्ण बाजार मंदिराच्या तुलनेने कमी उंचीवर आहे. बाजाराच्या रस्त्यावर जाण्यासाठी कृष्णा मंदिरासमोरील उतरून जावे लागते. […]
कृष्ण मंदीर, हंपी

कृष्ण मंदीर, हंपी – ‘कृष्णदेवराय किंवा कृष्णदेवराया हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा’, वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला व पुढे इ.स. १५२९ पर्यंत राज्य केले. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली. ओडिशावर […]
उग्रनरसिंह – लक्ष्मीनरसिंह, हंपी

उग्रनरसिंह/लक्ष्मीनरसिंह व बदावीलिंग/जलकुंडेश्वर, हंपी – नरसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ […]
व्याल शिल्प | Vyal Sculpture

व्याल शिल्प | Vyal Sculpture – प्रसिद्ध विजयनगर – हंपीतील जवळपास सर्वच मंदिरातील स्तंभांवर आगळ्या वेगळ्या शैलीतील विविध प्राण्यांपासून निर्मित केलेल्या व्याल शिल्पे आहेत. मंदिरात सिंह, हत्ती, मानव, वराह, अश्व, अज, नर ,मृग, वराह, वानर, सायाळ, नंदी, मेंडा, पोपट, उंदीर, हंस, शरभ ,शार्दूल व इतर अशा एकाधिक प्राण्यांचे शरीर म्हणून एकत्र करून ते देखील दर्शविले […]