नाथ संप्रदाय | Natha Sampraday

भारतीय इतिहासाच्या मध्यकाळातील एक शैव संप्रदाय. मध्यकाळात अफगाणिस्तानापासून ते बांगलादेश आणि तिबेट-नेपाळपासून ते दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत व्यापलेला एक प्रमुख संप्रदाय. या संप्रदायाची उत्पत्ती, उत्त्पती-स्थान, नामाभिधान, प्रवर्तक, सिद्धांत, उपासनापद्धती यांविषयी विद्वानांमध्ये बरीच मत-मतांतरे आढळून येतात. काही विद्वान मत्स्येंद्रनाथांना (मच्छिंद्रनाथ), तर काही गोरक्षनाथांना (गोरखनाथ) या संप्रदायाचा प्रवर्तक मानतात. असे असले तरी आज गोरक्षनाथांकडे या संप्रदायाचा एक कुशल संघटक […]

नाथ-योगिनी | Nath Yogini

नाथ संप्रदायातील स्त्रिया. नाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप महत्त्व आहे. या संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ कौल-योगिनी संप्रदायाचेही प्रवर्तक मानले जातात. तसेच नाथ-योगींबरोबर अनेक नाथ-योगिनींचे संदर्भ ग्रंथ, आख्यायिका व शिल्प यांमधून दिसून येतात. नाथ संप्रदायाच्या गुरू-शिष्य परंपरेमध्ये आदिनाथ व गिरिजा यांच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ व इतर नाथ-योगींची क्रमवारी पाहायला मिळते. या संप्रदायात […]

नवनाथ | Navanatha

नाथ संप्रदायातील प्रसिद्ध नऊ नाथ-योगी. नवनाथांच्या सर्व सूचींमध्ये एकवाक्यता नाही. नवनाथ विषयावरील ग्रंथांमध्ये नऊ नावे सर्वच ठिकाणी एकसारखी येत नाहीत. तेव्हा अमुकच नऊ नाथ आद्य नाथसिद्धांपैकी प्रमुख होते, असे दिसून येत नाही. निरनिराळ्या परंपरांत स्थानिक महत्त्वानुसार व कमी-जास्त आदरभावनेनुसार या गणना झाल्या असाव्यात, असे रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. असे असले तरी, नवनाथांच्या विभिन्न […]