राघोजी भांगरे | Raghoji Bhangare
भांगरे, राघोजी : ( ८ नोव्हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, […]