श्री जनार्दन विष्णु (माळी पेठ मेहकर )
माळीपेठ (मेहकर ) येथील श्री.विश्वनाथ जावळे यांच्या घरांचे बांधकाम करत असताना विष्णु देवतेची ही मुर्ती तीस -पस्तीस वर्षापुर्वी त्यांच्या परिवारास मिळाली.
मुर्ती ची आयुधे क्रमाने पाहता, श्री विष्णु चे ‘जनार्दन ‘ हे रुप आहे. मुर्ती प्रसन्न,विलोभनीय आहे वाहन गरुड,पत्नी श्रीदेवी व आयुध पुरुष सह येथे विष्णु देवता विराजमान आहे. प्रभावळीत विष्णुची दहा अवतार दिसतात.
या मुर्तींचे वैशिष्टे म्हणजे वरद मुद्रेत असलेल्या हातात एक लांब दांड्या चे कमळ उगवलेले दाखवलेले आहे.
वनमाला ,सामान्य दागिन्यांसह पायातील नूपुरें ,पायांच्या बोटात घातलेल्या ‘ अंगठ्या’ हे विशेष दिसते.
नतमस्तक होताना प्रश्न पडला की तीस पस्तीस वर्षापुर्वी मुर्ती सापडुन ही आतापर्यंत लोणार -मेहकर परीसरात याबदल माहिती नाही?
साधारण हजार वर्षा चा इतिहास ,अनेक पुराणात उल्लेख असलेल्या मेहकर शहरात गतकाळाचे अनेक पुरावे मिळत राहतात,मागे असेच मंदीराचे अवशेष सापडले होते ,नरसिंह देवता ,गोपाल कृष्ण ,शारंगधर बालाजी ,जनार्दन मुर्ती ही त्यापैकी एक पण यांचे पुढे काहीच होत नाही ??
सामान्यांना पुरातत्व च्या कोणत्या ही नोंदी आढळत नाही.शहरांत अनेक अवशेष ,मुर्ती सापडत राहतात तर त्याचे काय होते,कुठे संग्रहित,नोंद केल्या जाते ?
मेहकर नगर म्हणजे’शारंगधर बालाजी मंदीर” इतकीच मर्यादीत पुरातत्वीय ओळख सध्या आहे !!!
ठिकाण – माळी पेठ मेहकर
जि.बुलढाणा.