शिव-पार्वती विवाह स्थान , विरुपाक्ष मंदिर, हंपी –

हंपी मध्ये विजयनगर साम्राज्य उदयाला येण्या आगोदर शेकडो वर्षा पूर्वी , अर्थात येथील शिलालेखा नुसार ९-१० व्या शतकात बांधले गेले. या मंदिराच्या मूळे हंपी हे तिर्थक्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

मंदिरा बाबत कथा अशी आहे की , देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली तिचे नाव पंपा. हंपी हे पंपा या नावाचाच अपभ्रंश आहे. तसेच इथे वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे नावही देखील पंपा असेच होते.पंपा देवीस शिवाच्या प्रेमात होती ,देवीला शिवाशी लग्न करायचे होते, परंतु महादेव आपल्या तपश्चर्येत मग्न. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तेवढीच कठोर तपश्चर्या केली पाहिजे असे ठरवून देवी पंपा ( पार्वती ) या नदीच्या पलीकडे तीरावर तपश्चर्या करायला बसली. त्या ठिकाणी आजही पंपा देवीचं एक मंदिर आहे. शिवाला जेंव्हा या पार्वतीच्या कठोर व्रताचा बोध झाला तेंव्हा महादेव प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी शिव- पार्वतीचा विवाह पार पडला. तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी हे विरुपाक्ष मंदिर बांधलं आहे. या ठिकाणी विवाह करणे पवित्र मानले जाते. या मंदिरात आजही विवाह पार पडतात. शिव – पंपा ( पार्वती ) विवाह सोहळा दर वर्षी डिसेंबर महिन्यात इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देशभरातून भक्तमंडळी या उत्सवासाठी हंपी इथे येतात.

मंदिरे फक्त एक वास्तू नसून त्यात इतिहास , आध्यात्म , वास्तुशास्त्र , शिल्पकला सह ज्या काळात मंदिर बांधले गेले त्या वेळची संस्कृती व सामाजिक मानसिकता याचे प्रतिबिंब असते. शेकडो वर्षापूर्वी जी मंदीरे बांधली गेली त्यात अनेक प्रेम प्रसंग काय तर काम शिल्पं देखील बऱ्याच ठिकाणी आढळून आढळतात. लक्ष्मीनारायण विवाह, शिवपार्वती विवाह, नल दमयंती विवाह, रती- मदन, मेनका – विश्वामित्र, कृष्ण-गोपिका यांचे प्रेमप्रसंगाणे मंदिराच्या भिंती सजवलेल्या असतात. काही ठिकाणी तर प्रेम प्रसंगासोबतच, गर्भधारणा, प्रसूती, स्त्री चे वयात  येणे , लज्जागौरी ( यावर पोस्ट लवकरच….)देखील आढळतात.

नैसर्गिक गोष्टी त्याच सहज त्या काळात स्वीकारल्या जात होत्या याचे हे उदाहरण. आज आपण संस्कृतीच्या नावाखाली बोलतही नाही, त्या बद्दल स्पष्ट शिल्प मंदिराच्या दर्शनी भागावर दिसतात. आधुनिक जगा पेक्षा शेकडो वर्षा पूर्वी आपले समाज मन अधिक समृद्ध होते असे मला वाटते. एवढंच काय तर पूर्वीच्या काळात स्त्रियांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीचा होता. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या  बरोबरीने वावरत असत. स्त्रियांना आपले बौध्दिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध होती. मातृसत्ताक व्यवस्था अस्तित्वात होती. याचे उदाहरण म्हणजे महाभारतात आलेली ‘अरुंधती व वशिष्ठ’ कथा आहे. परंतु नंतरच्या काळात ही उज्ज्वल व अभिमानास्पद असलेली परंपरा खंडीत झाली. आधुनिकतेच्या नावाखाली परकीय संस्कृती च्या नावाखाली आपण नैसर्गिकता हरवून बसलो. प्रेमा सारखी निखळ नैसर्गिक गोष्ट ही अनैसर्गिक वाटू लागली आहे .

कुसुमाग्रज प्रेमाबद्दल लिहितात ……
प्रेम ,माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ….. !

विरुपाक्ष मंदिर हे धार्मिक दृष्टीने महत्वाचे आहेच मात्र शिव पार्वतीच्या प्रेमाचे व त्यांच्या विवाहाचे देखील प्रतीक आहे. जोडीने संध्याकाळी बसून हे मंदिर पहाणे किती  romantic  आहे हे तिथे बसूनच कळते.

सविस्तर माहिती करिता जरूर वाचा :
१) वैभवशाली विजयनगर साम्राज्य – एन. शहाजी
२) विजयनगर हृदयस्थ साम्राज्य – डाॅ. अस्मिता हवालदार
३) मराठी विश्वकोश
४) सफर हंपी बदामाची – श्री आशुतोष बापट
५) A Forgotten Empire ( Vijayanagar ) – Robert Sewell

Credit – Santosh Chavan(FB) | फोटोग्राफी : पृढवी चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *