शरभ शिल्पामागील संकल्पना

भगवान शंकराने धारण केलेले काल्पनिक पशूचे रूप म्हणजे शरभ होय या शरभ संकल्पनेबद्दल अनेक कथा ऐकविल्या जातात . शंकराचा निःसीम भक्त असलेल्या हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नृसिंह उतला – मातला . त्याने लोकांना उपद्रव द्यायला सुरुवात केली . शेवटी त्रस्त झालेल्या लोकांनी स्वतःच्या संरक्षणार्थ भगवान शंकराची प्रार्थना सुरू केली . ती ऐकून शंकराने नृसिंहाला शिक्षा करण्यासाठी पशू , पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि ते लोकांसमोर प्रकटले . तेच हे शरभ रूप आपल्या आजूबाजूला असलेल्या बहुतांश मंदिरे, किल्ले समाध्या यांचा द्वारावर किंवा बाह्यभिंतीवर आढळणारा आक्राळ विक्राळ चेहऱ्याचा पायामध्ये तसेच शेपटी मध्ये हत्ती पकडलेला पंखधारी प्राणी ,भगवान शंकराचे अर्ध मनुष्य व अर्धप्राणी रूप म्हणजे शरभ होय. त्याकाळी राज्यकर्ते आपल्या शक्तीचे प्रतीक म्हणून गड किल्ल्यावरती बाह्य भिंतीवर शरभ शिल्प लावत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *