ससिवेकलू गणेश, हंपी –

विजयनगरच्या कलात्मक कौशल्यांचे गणेशाची ही चार हात असलेली महाकाय मूर्ती एक उदाहरणआहे. या विशाल गणेश मूर्तीस स्थानिक स्तरावर  ससिवेकलू (मोहरी बीज) गणेश म्हणतात.  हेमकुट टेकडीच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हा गणेश आहे.

हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान गणेश (जो गणपती,   विनायक , लंबोदर सह अनेक नावाने ओळखले जातो ) आपल्या अति खाण्याच्या सवयीमुळे प्रसिद्ध आहे.  एक दिवस त्याने इतके खाल्ले की त्याचें पोट जवळजवळ फुटेल असे झाले.  त्याचे पोट फुटण्यापासून वाचवण्यासाठी त्याने एक साप पकडला आणि त्याला आपल्या पोटाभोवती एक पट्ट्याप्रमाणे बांधले. या गणेश शिल्पावर आपल्याला त्याच्या पोटभोवती साप कोरलेला दिसतो.

या एकसंघ शिल्प अंदाजे ८ फूट उंच आहे. गणेशाला चार हात असून त्याने सूळा, अंकुश, पाश व प्रसादपात्र धरले आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे  ,मूर्तीला प्रदक्षिणा मारत मागे आलो तर असे भासते  की माता पार्वती ने आपल्या बाळ गणेशाला आपल्या मांडीवर घेतले आहे .मूर्ती भोवती खुला मंडप तयार केला आहे.  नरसिंह द्वितीय या विजयनगर राजाच्या एका स्मरणार्थ चंद्रगिरीच्या (सध्याच्या आंध्र प्रदेशातील) व्यापाऱ्यांने हा मंडप १५०६ मध्ये मध्ये बांधला होता असे जवळ  सापडलेल्या शिलालेखांनुसार कळते. स्थानिक मानतात की हा व्यापारी इथे मोहरीचा व्यापार करायचा , त्यात त्याला प्रचंड नफा झाला व त्याने हे मंदिर बांधले.

सविस्तर माहिती करिता जरूर वाचा :
१) वैभवशाली विजयनगर साम्राज्य – एन. शहाजी
२) विजयनगर हृदयस्थ साम्राज्य – डाॅ. अस्मिता हवालदार
३) मराठी विश्वकोश
४) सफर हंपी बदामाची – श्री आशुतोष बापट
५) A Forgotten Empire ( Vijayanagar ) – Robert Sewell

Credit – Santosh Chavan(FB)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *