सिंधू नदीकाठी आपली संस्कृती वसवणारे स्पतसिंधू लोक अर्थात आपण….
आपला जगाशी पहीला संबंध आला तो पारसी लोकान्मुळे. पारसी मध्ये साधारणपणे ‘स’ ला ‘ह’ म्हणले जाते. म्हणूनच ‘असुर’ ला ‘अहूर’ आणि ‘सप्ताहला’ ‘हप्ता’ म्हणले गेले आणी त्याच प्रकारे ‘सप्तसिंधू’ संस्कृती बनली ‘हप्तहींदू’, सिंधकूश पर्वत बनला हींदकूश आणि जसजसे हप्तहींदू लोक सिंधूनदीच्या सात खोर्यापासून दूर दूर जाऊन वसु लागले तसे ते केवळ हप्तहिंदू पासून हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले…
ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या नवीन मित्राला आपण त्याचे आधीचे मित्र ज्या नावाने हाक मारतात त्याच नावाने आपणही हाक मारतो त्याचप्रमाणे पारसी लोखामुळे सर्व लोक आपल्या संस्कृतीला हींदू(सिंधू) संस्कृती म्हणू लागले… पण मुळ शब्द सिंधु हा आपलाच आहे त्यामुळे परकीयांनी आपल्याला हे नाव दीले हा तर्क बाद होतो.. फक्त उच्चारणात फरक मुळे आपण सिंधु चे हींदू झालो. चीनी प्रवाश्यांच्या नोंदीमधे आपल्याला हीन्तु,ईन्तु म्हटल्या गेले तर युरोपीयन लोकांनी आपल्याला indo म्हटले आणी सिंधु ला indus यावरुन पुढे भारताला हिंद india हे नाव पडले आणी भारतातील सर्व मतवाद्यांना हींदू आणी indian हे नाव पडले…
पुढे सामुदायीक धर्म मान्यता मिळाली ती इंग्रज काळात ज्या ज्या मत दर्शनवाद्यांनी आम्ही वेगळे असे संबोधले त्यांना वेगळा रीलिजन म्हणुन संबोधले गेले ..ज्यात जैन आणी शिख वेगळे झाले .. पण त्यांची नाळ परकीय नाही आणी ते ही विविध देवतांची पुजा करतात जसे हींदू ..पुढे बाबासाहेबांनी बुध्द धम्म म्हणुन सामुदायीक धर्म असाच निर्माण केला…

मतमतांरे बाजुला ठेवली तर आपण सर्व हींद निवासी हींदू आहोत म्हणजेच सिंधु आहोत …

हिंदू ही धार्मीक ओळख आताची आहे हिंदूचा मुळअर्थ भारतीय आहे… म्हणजे ही आपली राष्ट्रीय आणी सांस्कृतिक ओळख आहे … आपण कुण्याही श्रध्देचे पालन करणारे असो, नास्तिक असो, कुण्याही पंथाचे असो, शिख ,बुध्द, जैन ,मुस्लिम ही असलो तरी भौगौलिक,राष्ट्रीय, सांस्कृतिक दृष्टीने हिंद मधे राहणारे हिंदू आहोत…

मोहन ठाकरे देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *