लंकापती रावणाची भगवान शिवाच्याप्रती भक्ती सर्वांना माहीत आहे. पुराणातील एका कथेप्रमाणे कैलासावर विराजमान भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी रावण एकेक करून आपली नऊ मस्तक कापून ती शिवलिंगावर अर्पण करतो या परमभक्तीमुळं प्रसन्न झालेले भगवान शिव रावणासमोर प्रकट होतात. काही ठिकाणी रावणाने आपली मस्तक कापून ती अग्निकुंडात समर्पित केल्याचे सांगितले जाते.
रावण शिवलिंगावर आपली मस्तक कापून अर्पित करत असल्याचे हे शिल्प पेडगावच्या धर्मवीरगडावरच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेले आहे. यात शिवलिंगाच्या समोर बसून आपले दहावे मस्तक कापताना रावण दाखवलेला आहे तर उर्वरित नऊ मस्तक शिवलिंगावर अर्पण केलेली पाहायला मिळतात. हातात त्रिशुळ धारण केलेले भगवान शिव शिवलिंगातून प्रकट झालेले असून त्यांनी रावणाला आशीर्वाद देण्यासाठी आपला एक हात समोर धरलेला आहे.