णमो अरिहंताय!…. मावळ प्रांतातील पाले व उकसान गावात एका डोंगरावर ह्या लेण्या आहेत, ही नैसर्गिक गुहा असावी पण हिचे रूपांतर लेणीमध्ये करून खोदताना तीचा खडक ठिसूळ निघाल्याने ही लेणी अर्धवट अवस्थेत सोडुन दिली असावी… पण ह्या छोट्या लेणीत पाणी पिण्यासाठी पोढी म्हणजे पाणपोई खोदताना त्या व्यक्तीने इथे अरिहंत ह्यांना वंदन असे कोरून ठेवले आहे आहे….. अरिहंत म्हणजे ज्याने काम, क्रोध, लोभ, माया, मद, मत्सर ह्या षड्रिपूवर विजय मिळविला मिळवला आहे तो तीर्थंकर … आणि ह्या अरिहंतांमध्ये भगवान महावीर हे 24 वे तीर्थंकर आहेत, ज्यांच जन्मदिवस आज पाळला जातो… ह्या लेणीत जे “णमो अरिहंताय” हे शब्द खोदून ठेवले आहेत ते भारतातल्या इतर कोणत्याही लेणीमध्ये नाहीत.. ही लेणी एक भौगोलिक आश्चर्य असुन ही LAVA TUBE CAVE 66 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उलथापालथीत बनली… व लेणी खोदकाम हे साधारणपणे ख्रिस्तपुर्व 200 म्हणजे 2000 ते 2200 वर्षांपूर्वी केले असावे… भगवान महावीर ह्यांचे समकालीन भगवान बुद्ध… ह्या दोन्ही महानुभावांच्या शिकवणीचा प्रभाव त्यांच्या नंतर झालेल्या इतर महात्म्याच्या शिकवणी वर आढळतो… भगवान महावीर ह्यांना वंदन…. फोटो : Pale लेणी, मावळ, महाराष्ट्र, भारत…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *