खजुराहोतील शिल्प आणि कामसूत्राचा तथाकथित नरेटिव्ह

खजुराहोतील शिल्प आणि कामसूत्राचा तथाकथित नरेटिव्ह – खजुराहो हे कामशास्त्र किंवा श्रृंगार श्रेणीतील मंदिरापेक्षा खूप अधिक आहे. हिंदू ग्रंथांप्रमाणे जीवनाचे चार स्तंभ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तत्वज्ञानावर आधारित खजुराहोची शिल्परचना आहे. मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालताना मानवाला त्याच्या आयुष्यातील चार महत्वाच्या तत्वांची जाणीव ही शिल्प करुन देतात. बाळाला छातीशी कवटाळून प्रेमाच्या वर्षावातूनच मातृधर्माचं पालन […]
सप्तमातृका | Saptamatruka

सप्तमातृका | Saptamatruka – – ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा । वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ॥ अमरकोष 1.16 अमरकोषामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमातृकांचा लोकमाता म्हणून उल्लेख येतो. अगदी प्राचीन काळापासूनच या पूजनीय ठरलेल्या आहेत. प्राचीन काळ म्हणजे नेमक्या किती वर्षांपासून या लोकांच्या जीवनाचा भाग आहेत, असा प्रश्न […]
गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प

गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प – होयसळ राजवटीच्या मंदिरांमध्ये “भगवान शंकरानी केलेला गजासुर नामक राक्षसाचा वध” या कथेवरील आधारित अत्त्युत्कृष्ट शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. हा गजासुर म्हणजे महिषासुराचा पुत्र. दुर्गादेवीने महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे पाहून त्याचा पुत्र गजासुर संतप्त झाला व आपण याचा सूड उगविण्यासाठी ताकदवान व्हायला हवे या विचाराने त्याने ब्रह्मदेवाचे तप आरंभिले. काही वर्षांनी […]
हंपी | Hampi

हंपी | Hampi – तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर […]
सुडी | कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा

सुडी | कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा !!! कर्नाटकातल्या गदग परिसरात कल्याणी चालुक्य राजवटीत बांधलेली अनेक मंदिरे दिसून येतात. खास वेसर शैलीत असलेली शिखरे, लेथवर फिरवून केल्यासारखे गुळगुळीत खांब आणि अतिशय सुंदर अशी शिल्पे हे यांचे अगदी खास वैशिष्ट्य. इ.स. च्या अंदाजे १० ते १२ व्या शतकात यांची राजवट इथे नांदली. यांनी राष्ट्रकूट राजांचा पराभव करून आपली […]
विजय विठ्ठल, हंपी

विजय विठ्ठल, हंपी – कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ […]
हंपीचं विरुपाक्ष मंदिर

हंपीचं विरुपाक्ष मंदिर – माणूस हंपी पाहायला आला की तो प्रथम विरुपाक्ष मंदिरात जातो. विरुपाक्ष म्हणजे शंकराचं एक रूप. पुराणात त्याबद्दल धमाल कथा आहेत. ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. हंपीच्या हेमकुटा पर्वतावर ती तप करायची. तिथेच काम देवाचा नाश करून शिव ध्यानस्थ बसला होता. शिवाचं ध्यान भग्न करण्यासाठी प्रेमाच्या देवाला, कामदेवाला पाठवलं होत. पुढे शिवाचं आणि […]
हंपी आणि रामायण

हंपी आणि रामायण – विजयनगरच्या उभारणीत या दगडांनी खूप भार वाहिला. त्या काळातल्या कारागीरांनी दगडात भोकं केली. त्यात लाकडाचे तुकडे टाकले, ते भिजवले. भिजवल्यावर लाकूड प्रसरण पावले. त्याने दगडात भेगा तयार केल्या आणि मग ते तोडले. ग्रॅनाईटवर त्या जखमांच्या खुणा आजही दिसतात. तुंगभद्रा नदी ही त्यांच्या जीवनाचा स्रोत आहे. ‘जीवन’ या शब्दाचा कोणताही अर्थ घ्या. […]
हंपी | Hampi

हंपी तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. […]
हंपी येथील विठ्ठल मंदिर

हंपी येथील विठ्ठल मंदिर – हंपी मधील सर्व ऐतिहासिक स्मारकांमध्ये विठ्ठला मंदिर हे नितांतसुंदर स्मारक म्हणून ओळखले जाते .या मंदिराच्या मुख्य कक्षातील ५६ दगडी खांबावर हाताने थाप मारली असता त्यातून सुमधुर संगीत ध्वनी बाहेर पडतात. या मंदिराच्या बाहेर प्रसिध्द असा दगडी रथ आहे. या मंदिरा बाबत लवकरच सविस्तर पोस्ट येईलच, आज फक्त या मंदिराच्या संदर्भात […]
हंपी ट्रिप !

हंपी ट्रिप ! हंपी एक छोटंसं गाव काहीही म्हणा! विविध वास्तू आणि मंदिरांचा समुच्चय असलेलं एक ठिकाण. दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू शकतात हे अनुभवायचं असेल तर हंपीला भेटून त्याचा साक्षात्कार होईल. हरेक ठिकाणी विविध आकारात दिसणारे हे दगड हेच हंपीचं सौंदर्य आहे. त्या दगडांना बघायचं नाही, भेटायचं. मिठी मारायची! याच दगडी […]
हंपी | Hampi –

हंपी | Hampi – खरंतर हे ठिकाण म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तिथं जायचं, मज्जा करायची, खायचं, प्यायच, मनसोक्त जगायचं. आणि हो खरंच इथ गेलं की माणूस आपलं दुःख, आपली निराशा, आपले प्रॉब्लेम सगळं विसरून तिथं रमत जातो. नाही हे ना ठिकाणचं तसं आहे, अन् आता तर हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित पण केलंय. प्रत्येकानं […]