तुम्ही महादेवाची पिंड हा शब्दप्रयोग करीत असाल तर तुम्ही नाथ संप्रदयाचा जवळ आहत अणि लिंग शब्द वापरत असाल तर समन्वयीत शैवशैवपंथतील आहात.पिंडी ते ब्रम्हांडी हा नाथ संप्रदया चा सिद्दांत आहे..तर .कौल व नाथ हे अद्वैतवादी असून कार्यकारणभेद मान्य करीत नाहीत. यांच्या सिद्धान्तानुसार सृष्टीची निर्मिती शक्तीपासून झाली व शक्ती ही शिवापासून उत्पन्न झाली. कौल व पर्यायाने नाथपंथात मात्र सृष्टीची निर्मिती शक्तियुक्त आदिनाथ शिवापासून झाली..हे मान्य आहे..यावरून स्पष्ट होते की, अवधूत, कौल व नाथसिद्ध हे अद्वैती असून त्रिपुरा सुंदरीचे उपासक आहेत. मत्स्येंद्रगोरक्षांचे विवेचन व ग्रंथनिर्मितीही पूर्वसूरींच्या वचनावर व तंत्र आणि उपनिषदावर आधारलेले आहे. गोरक्षप्रतिपादित शिवशक्त्यद्वैताला उपनिषदांच्चे व तांत्रिक ग्रंथाचे पूर्ण पाठबळ आहे. कौल व तांत्रिक शैव सिद्धांची वचने उद्‌धृत करून पदपिंडसामरस्याचा जो सिद्धान्त गोरक्षांनी मांडला तो अजातवादाशी व त्याच्याशी सुसंगत असलेल्या विवर्तवादाशी संवाद साधणारा व राखणारा आहे. गोरक्षमताचा प्रसार महाराष्ट्रात इ. स. १०३५ ते ११३० दरम्यान झाला.

गोरक्ष आपल्या गुरूसमवेत महाराष्ट्रात आले होते. मत्स्येंद्रनाथांनी चौरंगी- नाथांची भेट नाशिक परिसरातील सप्तशृंगी पर्वतावर घेतली. ह्या शक्ती केंद्राजवळ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. शिवशक्तीची स्थाने एकाच परिसरात असल्याने तेथे साधक-सिद्धांची वर्दळ असणे साहजिकच आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनास पाशुपत, लाकुलीश, कालमुख माहेश्वरादी सांप्रदायिक येत असले पाहिजेत. या शैव सांप्रदायिकांची मठमंदिरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी असून त्या मठमंदिरांत चार वेद, उपनिषदे, षद्ददर्शने, साहित्यविद्या, व्याकरण व लाकुलीशादी शैवागमांचे अध्ययन होत होते. शके ९५७ च्या गणेशवाडी व धारवाडजवळच्या अब्लूर शिलालेखात लाकुलीशादी शैवागमांचे अध्ययन करणाऱ्या लाकुलीश पंडितांचे वर्णन आले आहे. हे पंडित तर्क- भीमांसा व श्रद्द्दर्शनाबरोबर जैनबौद्धादी अवैदिक दर्शनाचे अध्ययन करीत. परंतु गोरक्षांच्या सिद्ध मतांच्चा उल्लेख वा वर्णन ते करीत नसत. यावरून असे समजण्यास प्रत्यवाय नसावा की, इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या प्रथम खंडात तरी महाराष्ट्र- कर्नाटक भागात मत्स्येंद्र-गोरक्षांच्या नाथपंथाचा प्रवेश झाला नव्हता किंवा, निदान ते मत प्रभावी तरी झाले नसावे.
याच सुमारास शंकराचार्यप्रतिपादित अद्वैतमताचाही प्रसार सर्वत्र झालेला होता. आद्य शंकराचार्यांनी केवलाद्वैताचा पुरस्कार प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहून केला व त्यानंतर शांकर-परंपरेतील सुरेश्वराचार्य व वाचस्पती मिश्रादींनी द्वैतमत निरसन करून शांकरमताची ध्वजा सर्वत्र फडकावली. शंकराचार्यानी माहेश्वर शैवादिकांचे खंडन ब्रह्मसूत्र भाष्यात केले असले तरी नाथपंथाचे खंडन केलेले नाही. एवढेच नव्हे तर शंकराचार्यांच्या पाश्च्यात इसवी सन ९००-१२०० च्या दरम्यान होऊन गेलेल्या शैवदिकनी शांकराचर्याच्या मताचे एकानेही खंडण केले नाही ही घटना फार बोलकी आहे…

©Vishal Phutane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *