कृष्ण बाजार, हंपी –

‘कृष्ण बाजार’ हे नाव कृष्ण मंदिराशी संबंधित आहे,हंपीमधील तुलनेने नव्याने उत्खनन केलेले हे ठिकाण आहे. कृष्ण मंदिरास आवश्यक पाण्यासाठी पवित्र कुंड (पुष्करणी) देखील कृष्णा बाजारच्या शेजारीच आहे त्याला ‘कल्याणी’ असंही म्हणतात.

मंदिरा समोरील हा रथमार्ग आहे. कृष्ण बाजार मंदिराच्या तुलनेने कमी उंचीवर आहे. बाजाराच्या रस्त्यावर जाण्यासाठी कृष्णा मंदिरासमोरील उतरून जावे लागते. कृष्ण मंदिरा समोर दोन्ही बाजूंना बाजार पेठ/तेरुविथी च्या मंडपाचे अवशेष आहेत. साधारण ५० मीटर रुंद व ५७० मीटर लांब बाजारपेठ आहे. विष्णू, बाळकृष्ण, लक्ष्मी, नरसिंह, अलवार संत तसेच वैष्णव शिल्प आढळतात. पूर्वी संपूर्ण बाजार गाळात गाडला गेला होता यावर केळीच्या झाडांची लागवड केली गेली होती. उत्खनन करण्यापूर्वी येथे बाजारपेठ असल्याचे सांगणे देखील अशक्य होते. कृष्ण बाजार हे व्यापार व संस्कृती चे केंद्र होते, येथे प्रतिष्ठित व्यापारी यांचे दुकान, कार्यालय व घरे होती. सोमवारी येथे धान्य बाजार भरत असल्याचे सांगितले जाते.

कृष्ण मंदिराच्या बाजूने जाताना बाजाराच्या रस्त्यावर आपल्याला मंडपांच्या लांबच लांब रांगा दिसतात.  जुन्या संरचनांचे खोदकाम केलेले ढिगारे आणि दगडी मार्ग देखील आपल्याला दिसतात. बाजाराच्या जराशी पुढे पवित्र तलाव आहे, त्याच्या मध्यभागी असलेला छोटा मंडप आणि टाकीला सर्व बाजुंनी रेखीव पायऱ्या आहेत. बाजाराच्या थोड्या अंतरावर, मुख्य रस्त्याकडे (हंपीकडे) आणि कृष्णा मंदिर समोर एक आयताकृती दगडी पेटी असलेला छोटा मंडप आहे तो एका विशाल दगडात कोरलेला आहे. या मंदिराच्या कार्यकाळात भाविक अन्नधान्य येथे अर्पण करायचे.

कृष्ण मंदिराला भेट दिल्यानंतर  माटुंगा टेकडीवर चढताना कृष्ण बाजाराचे एक सुंदर दृश्य पाहायला मिळू शकेल.

मंदिराच्या पश्चिम दाराजवळ एक वास्तू दिसते बहूतेक ते मंदिराचे धान्य कोठार असावे.

सविस्तर माहिती करिता जरूर वाचा :
१) वैभवशाली विजयनगर साम्राज्य – एन. शहाजी
२) विजयनगर हृदयस्थ साम्राज्य – डाॅ. अस्मिता हवालदार
३) मराठी विश्वकोश
४) सफर हंपी बदामाची – श्री आशुतोष बापट
५) A Forgotten Empire ( Vijayanagar ) – Robert Sewell

Credit – Santosh Chavan (FB)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *