जोतेदार

जोतेदार या नव्या जमीनदार जातीचा उगम इंग्रज काळात झाला होता. ह्या जोतेदार लोकांकडे जमिनी असतं ते अन्य शेतकऱ्यांकडून ती जमीन उपयोगात आणत.
प्राचीन काळी सर्व जमीन गणाच्या मालकीची असे. गणातील राजे ही जमीन कृषी दासाकडून उपयोगात आणित.
पाली साहित्यात शुद्धोदनाच्या शेतावर हजार कृषी दास काम करताना दिसतात. वप्प मंगल सणाला च हे राजे विधीपूरता शेतात दिसतात. (हा फोटो वप्प मंगल विधी शी संबंधित आहे कारण त्याच वेळी सिद्धार्थ जांभळाच्या झाडाखाली ध्यान मग्न झाला होता)
जोतिबा मधील जोत हा शब्द नांगरावरून आला आहे. त्याचा अर्थ नांगरणारा माणूस/जोत धरणारा गडी/ शेतकरी असं राची ढेरे म्हणतात. हा जोतिबा देव हिमालयातुनच महालक्ष्मीच्या मदतीसाठी आलेला आहे. केदार या शब्दाचा अर्थ सर्व प्राचीन कृषीविषयक ग्रंथात क्षेत्रासाठी वापरलेली संज्ञा आहे. असे रांची ढेरे म्हणतात.
केदारनाथ म्हणजे क्षेत्राचा नाथ (मालक) असा त्याचा अर्थ होतो.
जोतीबाला रवळनाथ ही म्हणतात. रवळ हा शब्द काही जण वारूळ पासून राऊळ व त्यापासून रवळ असा बनला असे म्हणतात.
पण तो शब्द राऊळ पासून बनला असून राहुलनाथ चेच रवळनाथ झाले आहे.
केदार जोतिबा हिमालयाच्या क्षेत्रातून आल्यामुळे उत्तरेकडच्या जपान चायना मध्ये सुद्धा जोतो संप्रदाय उदय पावलेला दिसतो तो संप्रदाय महाराजा जोतो व महाराणी कोकेन (कोळ-केन म्हणजे कोळ कन्या) यांच्या स्मृतीत स्थापला गेला.
मी मागे म्हटले होते की महायान पंथाने बुद्धाच्या जवळच्या लोकांना बोधिसत्व पद दिल असून अवलोकितेश्वर व तारा हे बुद्धाच्या वडील आणि आईला दिलेलं रूप आहे. बुद्धापासून अवलोकितेश्वर निर्मिती दाखवल्यामुळे तो नाथ चुकून राहुलनाथ म्हणून ओळखला गेला.
विठ्ठलाला ही रवळनाथ म्हणतात. विठ्ठलाची व आंध्र मधील विठ्ठलाची (बालाजी) मूर्ती अवलोकितेश्वर ची आहे. विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी देवी (रुमिनी देई) गजलक्ष्मी स्वरूपात दिंडीरवनात आहे. बालाजी कोल्हापूर महालक्ष्मी चा पती आहे. असे काही वैष्णव मानतात. जैन तिला पद्मावती मानतात. जी बालाजीची पत्नी आहे. पद्मावती म्हणजे कमळावर बसणारी. कोल्हापूर चा जोतिबा महालक्ष्मी च्या मदतीसाठी कोल्हापूर मध्ये आला. ढेरे यांच्या मते तो यमाईचा पती आहे. यमाईची मूर्ती गजलक्ष्मी स्वरूपात आहे. जोतिबा स्तोत्रात त्याला एकविरा पती म्हटलेलं आहे अर्थात यमाई म्हणजेच एकविरा. कारल्याच्या बौद्ध लेण्यात एकविरा आहे.
विठ्ठलेश्वर – राजवाडे यांनी विष्ठल हे याशब्दाचे मूळ रूप दिले आहे. विष्टी वरून तो शब्द आला असून त्याचा अर्थ दास।असा होतो. कृषी दासांचा ईश्वर तो विठ्ठलेश्वर
अवलोकितेश्वर – अव म्हणजे खाली ज्यांचं स्थान आहे त्यांचा ईश्वर म्हणजे दासांचा ईश्वर अवलोकितेश्वर
तसाच जोतेदार किंवा जोतिबा म्हणजे कृषी दासांचा ईश्वर.
ईश्वर या शब्दाचा पाली अर्थ राजा, land lord असा आहे.यमाई ही गजलक्ष्मी स्वरूपात असते तर जोतिबा जोत नांगरणारा किंवा ज्योती स्वरूपात ओळखला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *