चौल | Chaul

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर, चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे. मुंबईजवळील कान्हेरी बौद्धलेणीसमूहातील इ. स. १३० या काळातील शिलालेखात ‘चेमुल्ला’ […]

नागरा | Nagara

वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील भैरव टेकाडाचे १९७९ ते १९८२ या कालावधीत सलग तीन वर्षे पुरातत्त्वीय उत्खनन केले गेले. यांतील पहिले उत्खनन सलग दोन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागातर्फे अ. प्र. जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर तिसऱ्या वर्षी […]

वाशिम | Washim

महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी […]

नगरधन | Nagardhan

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी. अंतरावर वसले आहे. येथील प्राप्त पुरातत्त्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा लक्षात घेऊन नगरधन हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहर प्राचीन नंदिवर्धन असावे, अशी शक्यता पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सर्वप्रथम व्यक्त केली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनीही […]

नमनखेळे | Namankhele

नमनखेळे : महाराष्ट्रातील उत्तर कोकणातला लक्ष्यवेधी असा विधीनृत्य प्रकार. धार्मिक विधी म्हणून त्याची ओळख आहे. हा नृत्यप्रकार लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केला जातो. हा रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचा प्रसिद्ध असा विधीनृत्य प्रकार आहे. होळी सणाला हा नृत्य प्रकार कुणबी समाजातील लोक सादर करतात, यात सहभागी होणाऱ्या कलावंताला खेळे म्हणतात. हे खेळे होळी सणाला पालखी […]

पांगुळबैल | Pangul

पांगुळबैल : शिकविलेल्या बैलाच्या सहाय्याने खेळ करणे म्हणजेच नंदीबैल किंवा पांगूळबैल होय. नंदीबैलाच्या खेळाला कोकणात पांगुळबैल म्हणून ओळखले जाते. पिंगुळीच्या पांगुळ घराण्याने नंदीबैलाचे खेळ करणाऱ्या तिरमल घराण्यातील कानडेंकडून नंदीबैलाची कला शिकून घेतली आणि स्वत: नंदीबैलाचे खेळ पिंगुळी परिसरात ते करू लागले, तेव्हापासून या खेळाला पांगुळबैल असे नाव पडले. पांगुळ बैल म्हणजेच शिकविलेला बैल. त्याला खेळवून […]

पैठण व पिंगुळी चित्रकथी

चित्रकथी ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्त्वपूर्ण लोककला-चित्रपरंपरा आहे. तिचा कथन आणि चित्रण (दृक्श्राव्य) असा दुहेरी आविष्कार आढळतो. साधारणतः ३०×४० सेंमी.च्या कागदावर ही चित्रे काढलेली असतात. संग्रहालयांतील काही उपलब्ध चित्रे, कागदाचा आकार आणि त्यांवरील उत्थित छापाचे ठसे यांवरून ती अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसावे शतक या काळातील असावीत. चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात. पोथीचा […]

चित्रकथी | Chitrakathi

चित्रकथी : चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे ; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच […]

भीमाशंकर अभयारण्य | Bhimashankar Wildlife Sanctuary

भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे. भीमाशंकरचे वन हे पाणगळ, निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत पसरलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ १३१ चौ.किमी आहे. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे ३,००० […]

फणसाड अभयारण्य | Phanasad Wildlife Sanctuary

महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ.किमी. असून हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून १२ किमी. अंतरावर आहे. हे अभयारण्य काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सर्वा, सुपेगाव अशा एकूण ३८ […]

जत्रा | Fair

एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे म्हणता येईल. इस्लामधर्मीय सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त जो उत्सव होतो, त्यास उरूस वा जुलूस म्हणतात. त्या त्या देवतेविषयी किंवा तीर्थक्षेत्रांतील एक वा अनेक देवतांविषयी पूज्यभाव वा सत्पुरुषाविषयी […]

नाथ संप्रदाय | Natha Sampraday

भारतीय इतिहासाच्या मध्यकाळातील एक शैव संप्रदाय. मध्यकाळात अफगाणिस्तानापासून ते बांगलादेश आणि तिबेट-नेपाळपासून ते दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत व्यापलेला एक प्रमुख संप्रदाय. या संप्रदायाची उत्पत्ती, उत्त्पती-स्थान, नामाभिधान, प्रवर्तक, सिद्धांत, उपासनापद्धती यांविषयी विद्वानांमध्ये बरीच मत-मतांतरे आढळून येतात. काही विद्वान मत्स्येंद्रनाथांना (मच्छिंद्रनाथ), तर काही गोरक्षनाथांना (गोरखनाथ) या संप्रदायाचा प्रवर्तक मानतात. असे असले तरी आज गोरक्षनाथांकडे या संप्रदायाचा एक कुशल संघटक […]