सह्याद्रि
सह्याद्रि : पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० […]
भोकरदन | Bhokardan
भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा मार्गावर आहे. सातवाहन काळात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८-५९ मध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले. हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावर होते […]
नायगाव मयूर अभयारण्य | Nayagaon Mayur Wildlife Sanctuary
मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारातील आहे. या वनात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शासनाने ८ डिसेंबर १९९४ ला हे क्षेत्र “नायगाव […]
कौंडिण्यपूर | Kaundinyapur
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा […]
खोलापूर | Kholapur
खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय […]
देवराई | Sacred Grove
निसर्ग संवर्धनाची प्राचीन परंपरागत पद्धत. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भटकी जीवनशैली सोडून मानव जेव्हा शेती करू लागला; त्या वेळी जंगलतोड जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे वस्ती व गावाजवळील जंगलाचा काही भाग राखून ठेवण्यात आला. या भागालाच लोक श्रद्धेने देवराई (Sacred Groves) संबोधू लागले. लोकांनी देवावरच्या श्रद्धेने, देवाचा कोप होण्याच्या भीतीने या जंगल क्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिले. […]
भोन | Bhon
महाराष्ट्रातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यापासून आग्नेयेला सु. २१ किमी. अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्वज्ञ भास्कर देवतारे यांनी पूर्णा खोऱ्यात केलेल्या गवेषणातून या महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळाचा शोध लागला (२०००-२००१). सकृद्दर्शनी येथे मोठ्या प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष आढळले. गावातून नदीकडे जाणाऱ्या घळवजा रस्त्याच्या दुतर्फा आढळणाऱ्या विटा आणि […]
तेर | Ter
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर असून तगरचे पुरावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या टेकाडांवर सांप्रत आढळतात. रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे यांना येथे सापडलेल्या प्राचीन कलात्मक वस्तूंच्या संग्रहामुळेच महाराष्ट्र शासनाने येथे संग्रहालय उभारले […]
पौनी | Pauni
महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक काळातील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून पौनी प्रसिद्ध आहे. पौनी येथील पुरावशेष सर्वप्रथम पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स (१८७९), नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक सर जॉन मार्शल यांच्या […]
ब्रह्मपुरी, कोल्हापूर | Brahampuri, Kolhapur
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात आले. त्यामुळे करवीरच्या इतिहासाची दोन हजार वर्षांची परंपरा उजेडात आली. ब्रह्मपुरी येथील प्राचीन टेकाडावर इ.स. १८७७ मध्ये इ. स. पू. कालीन बौद्ध स्तूपाचे अवशेष मिळाले. त्यांतील बहुतांश मूर्ती बौद्ध होत्या. स्तूप भाजलेल्या विटांत बांधलेला व […]
पैठण | Paithan
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्राचीन नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, औरंगाबाद शहराच्या दक्षिणेस ५६ किमी. अंतरावर वसले आहे. सध्याचे पैठण हे प्राचीन प्रतिष्ठान होय. प्राचीन भारतीय वाङ्मयात आणि परंपरेत भारतात दोन प्रतिष्ठान या नावाची ठिकाणे असल्याचे आढळून येते. दुसऱ्या ‘प्रतिष्ठान’बाबत नंदलाल डे म्हणतात की, ‘उत्तरेकडील प्रतिष्ठान म्हणजे गंगेच्या पूर्व किनाऱ्यावर […]
मांढळ | Mandhal
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन वस्तू सापडल्या. या कारणास्तव नागपूर विद्यापीठाच्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) पुरातत्त्व विभागाने शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी, राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१), चाचणी […]