गुड्डीमल्लमचे शिवलिंग

गुड्डीमल्लमचे शिवलिंग – इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. लिंगाच्या समोर एक व्यक्ती उजव्या हातात शिंग असलेला प्राणी धरलेला असून डाव्या हातात कुंभ आणि परशु घरलेला आहे. मूर्ती पाच फूट उंचीची असून स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला […]
शिव ते महादेव

शिव ते महादेव – शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या […]
शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव आणि त्रिपुरारी पौर्णिमा

शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव – आज कार्तिक स्नान समाप्ती आणि कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा. आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेच्या दिनानिमित्त अनेक पौराणिक संदर्भ आहेत. तसेच बौद्ध आणि शीख धर्मातही आजचा दिवस तसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्रिपुर संहारा ची कथा महाभारतामध्ये वाचायला मिळते. तारकासुराची तीन मुले होती. […]
माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी

माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी – कल नुमाइश में फिर गीत मेरे बिके और मैं क़ीमतें ले के घर आ गया, कल सलीबों पे फिर प्रीत मेरी चढ़ी मेरी आँखों पे स्वर्णिम धुआँ छा गया। नुकतीच ही गजल वाचण्यात आली. कोण्या अनामिकाने हे लिहलेले वाचून मन खिन्न झाले. नुकतेच माणकेश्वर (तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद) येथील माणकेश्वर मंदिरास […]
पाल शिल्प कलेतील मातृ भावना..

पाल शिल्प कलेतील मातृ भावना.. पाल कालखंडात दहाव्या शतकात निर्माण झालेली साधारणतः लांबी 35″ (89 सेमी) असलेली ही मूर्ती आहे. एका ऋषीची पत्नी सुचिस्मती हिला स्वतः शिवासारखा मुलगा हवा होता. तिची इच्छा लक्षात घेऊन तिच्या पतीने वाराणसी (बनारस) येथे एका लिंगाची पूजा केली आणि शिवाने स्वत:ला सुचिस्मतीचा मुलगा म्हणून जन्म घेतला, ज्याचे नाव गृहपती होते. […]
नवदुर्गा – प्रतिमा शास्त्रीय लक्षण

पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी – कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक […]
गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प

गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प – गणपतीची सर्वात प्राचिन शिल्प चीन मध्ये आहे असे म्हटले जाते परंतु मुंबई मधील चोर बाजारात सापडलेले हे नाणे इसैवी सन चौथ्या ते पाचव्या शतकातील असावे या नाण्याच्या पाठी धम्मलिपी अंकित लेख आहे ज्यावर बैलाचे शिल्प आहे. त्याखाली जा ग (इ) श्व र असे लिहलेले आहे. हे नाणे डॉ. कोठारी यांनी […]
खजुराहोतील शिल्प आणि कामसूत्राचा तथाकथित नरेटिव्ह

खजुराहोतील शिल्प आणि कामसूत्राचा तथाकथित नरेटिव्ह – खजुराहो हे कामशास्त्र किंवा श्रृंगार श्रेणीतील मंदिरापेक्षा खूप अधिक आहे. हिंदू ग्रंथांप्रमाणे जीवनाचे चार स्तंभ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तत्वज्ञानावर आधारित खजुराहोची शिल्परचना आहे. मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालताना मानवाला त्याच्या आयुष्यातील चार महत्वाच्या तत्वांची जाणीव ही शिल्प करुन देतात. बाळाला छातीशी कवटाळून प्रेमाच्या वर्षावातूनच मातृधर्माचं पालन […]
सप्तमातृका | Saptamatruka

सप्तमातृका | Saptamatruka – – ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा । वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ॥ अमरकोष 1.16 अमरकोषामध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुण्डा या सप्तमातृकांचा लोकमाता म्हणून उल्लेख येतो. अगदी प्राचीन काळापासूनच या पूजनीय ठरलेल्या आहेत. प्राचीन काळ म्हणजे नेमक्या किती वर्षांपासून या लोकांच्या जीवनाचा भाग आहेत, असा प्रश्न […]
गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प

गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प – होयसळ राजवटीच्या मंदिरांमध्ये “भगवान शंकरानी केलेला गजासुर नामक राक्षसाचा वध” या कथेवरील आधारित अत्त्युत्कृष्ट शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. हा गजासुर म्हणजे महिषासुराचा पुत्र. दुर्गादेवीने महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे पाहून त्याचा पुत्र गजासुर संतप्त झाला व आपण याचा सूड उगविण्यासाठी ताकदवान व्हायला हवे या विचाराने त्याने ब्रह्मदेवाचे तप आरंभिले. काही वर्षांनी […]
हंपी | Hampi

हंपी | Hampi – तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर […]
सुडी | कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा

सुडी | कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा !!! कर्नाटकातल्या गदग परिसरात कल्याणी चालुक्य राजवटीत बांधलेली अनेक मंदिरे दिसून येतात. खास वेसर शैलीत असलेली शिखरे, लेथवर फिरवून केल्यासारखे गुळगुळीत खांब आणि अतिशय सुंदर अशी शिल्पे हे यांचे अगदी खास वैशिष्ट्य. इ.स. च्या अंदाजे १० ते १२ व्या शतकात यांची राजवट इथे नांदली. यांनी राष्ट्रकूट राजांचा पराभव करून आपली […]