विदर्भ | Vidarbha

विदर्भ : महाराष्ट्र राज्यातील एक भौगोलिक प्रदेश. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश सांप्रतच्या विदर्भात केला जातो. या भूप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश १९° ५’ ते २१° ४७’ आणि पूर्व रेखांश ७५° ५९’ ते ७९° ११’ या दरम्यान झालेला असून यातील बहुतेक भाग तापी, पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व […]

विजापूर | Vijapur

विजापूर : कर्नाटक राज्यातील इस्लामी वास्तूशैलीसाठी ख्यातनाम असलेले इतिहासप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि त्याच नावाच्या जिल्हयाचे मुख्यालय. लोकसंख्या १,८६, ९३९ (१९९१). ते दक्षिण रेल्वेच्या मुंबई-बंगलोर रूंदमापी मार्गावर, मुंबईच्या आग्नेयीस सु.४०२ किमी.आणि सोलापूरच्या दक्षिणेस सु. ८१ किमी. वर वसले आहे. ते रस्त्याने पंढरपूर, सोलापूर, सांगली इ. महाराष्ट्रातील शहरांशी तसेच आंध्रप्रदेशातील हैदराबाद व कर्नाटकातील इंडी, बादामी इ. गावांशी […]

विहार | Vihar

विहार : बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान व पाठशाळा असणारी शैल वास्तुरचना. ⇨ चैत्यगृहांच्या निर्मितीबरोबरच या वास्तु प्रकाराचे बांधकाम भारतात प्रामुख्याने कार्ले, भाजे, नासिक, वेरूळ, पितळखोरे, भारहूत, सांची, सारनाथ, उदयगिरी, कोंडाणे, मथुरा, जुनागढ, अमरावती, कान्हेरी इ. ठिकाणी झालेले आढळते. इ. स. चौथ्या शतकापर्यंतच्या कालखंडात प्रामुख्याने हा बौद्ध वास्तुप्रकार विकसित झाला. मध्यभागी मोकळे प्रशस्त सभागृह वा दालन व […]

वीरगळ | Herostone

वीरगळ : युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. ‘वीराचा दगड’ ह्या अर्थाच्या ‘वीर-कल’ ह्या कन्नड शब्दावरून ‘वीरगळ’ हा शब्द आलेला आहे. वीरगळाला ‘वीराचा दगड’ किंवा केवळ ‘वीर’ म्हणूनही संबोधतात. ‘वीरगळां’ चा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला. कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या […]

वैष्णव संप्रदाय | Vaishnav Sampraday

वैष्णव संप्रदाय : विष्णू व त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची साराधना करणारा संप्रादाय. वैष्णव संप्रादायाचे मुख्य दैवत नायारण-विष्णू व त्याचे विविध अवतार होत. नारायण या अवैदिक देवाचा उल्लेख प्रथम शतपथ ब्राह्यणात आढळतो. ⇨विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आढळतो. यावरून आर्य देवताकुलात तो प्रथम प्रतीचा देव नसावा, असा अंदाज […]

शिखर

शिखर : भारतीय ⇨ मंदिर-वास्तुकलेचा एक प्रमुख घटक. ⇨ देवालयातील गर्भगृहावर उंच व वर निमुळता होत गेलेला मनोरेवजा वास्तुघटक म्हणजे शिखर होय. बहुधा त्यात अनेक मजले वा थर योजलेले असतात. शिखर हा देवालय-वास्तूचा उच्च बिंदू होय. देवमूर्ती असलेल्या पवित्रम गाभाऱ्याचे द्योतक म्हणजे शिखर होय. भारतात शिखराच्या धारणेच्या विविध शैली असल्या, तरी त्याचे कार्य मुख्यत्वे गाभाऱ्यातील […]

शिर्डी | Shirdi

शिर्डी : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ. लोकसंख्या २७,५३० (२००१). हे अहमदनगर-कोपरगाव मार्गावर अहमदनगरच्या उत्तरेस सु. ८५ किमी. वर असून दौंड-मनमाड लोहमार्गावरील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून सु. १८ किमी. वर आहे. साईबाबा वयाच्या सोळाव्या वर्षी, एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर १८७२ मध्ये येथे आले. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळच्या खंडोबा मंदिरात नित्य दर्शनास जाणाऱ्या, म्हाळसापती नावाच्या सुवर्णकाराने त्यांना […]

शिल्पकला | Sculpture

शिल्पकला : (स्कल्पचर). शिल्प या संज्ञेचा अर्थ सामान्यपणे कौशल्यपूर्ण निर्मिती असा सर्वसमावेशक व म्हणून विविधार्थसूचक असल्याने तिच्या वापरात नेमकेपणा येण्यासाठी वास्तुशिल्प, काष्ठशिल्प, शब्दशिल्प, स्वरशिल्प, मूर्तिशिल्प यांसारख्या सामासिक शब्दांचा उपयोग करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला म्हणजे मूर्तिकला एवढ्या मर्यादित अर्थाने विवेचन केलेले आहे. शिल्पाविष्कार हा इंद्रियगोचर त्रिमित आविष्कार असल्याने त्याला पार्थिव अस्तित्व असते आणि वास्तव अवकाशावर […]

शिवाजी विद्यापीठ | Shivaji University

शिवाजी विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. स्थापना कोल्हापूर येथे १९६२ साली. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती व तेथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. महाराष्ट्र शासनाने १९६२ साली ‘विद्यापीठ कायदा’ मंजूर करून या विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘ग्रामीण युवकांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार’ आणि ‘विज्ञान व मानव्यविद्या या क्षेत्रांतील पायाभूत […]

शक्तिपीठ | Shaktipeeth

शक्तिपीठ : शक्तीच्या – देवीच्या – उपासनेची काही विशिष्ट स्थाने ही ‘शक्तिपीठे’ म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणच्या भैरवाचे आणि शक्तीचे नाव वेगळे असते. बहुतेक पुराणांत शक्तिपीठांची संख्या एकावन्न मानलेली असली, तरी काही ग्रंथातून ही संख्या वेगवेगळी –चार, सात, आठ, अठरा, बावन्न इ. दाखविण्यात […]

सप्तशृंगी | Saptashringi

सप्तशृंगी : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ. ते नासिक जिल्ह्यात चांदोर ( चांदवड ) पर्वतश्रेणीत नासिकच्या उत्तरेला सु. ४४ किमी.वर सप्तशृंगी देवी आहे. येथील शिखरांची सस.पासून उंची १,४८० मी. आहे. सात शिखरांचे ( शृंगे ) स्थान म्हणून यास सप्तशृंगी हे नाव पडले. मात्र प्रत्यक्षात येथून चारच शिखरे दिसतात. म्हणून त्याचा उल्लेख कधीकधी चतु:शृंगी असाही करतात. ब्रह्मवैवर्त […]

सत्यनारायण

सत्यनारायण : बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले एक काम्य – म्हणजे काही इच्छा मनात ठेवून केलेले -व्रत. सत्यनारायण ही ह्या वताची प्रमुख देवता. ह्यांखेरीज गणपती, गौरी, वरूण, अष्ट-दिक्पाल, नवग्रह इ. परिवारदेवताही आहेत. सत्यनारायण ह्या शब्दात सत्य आणि नारायण अशी दोन नावे एकत्र आल्यासारखी दिसतात. पेशवेकालीन कागदोपत्री या पूजेचा (वताचा) उल्लेख आढळत नाही. परंतु गेल्या शंभर […]