त्रिमूर्ति | Trimurti
त्रिमूर्ति : तीन देवतांच्या संयुक्त प्रतीकात्मक आविष्कारास ही संज्ञा लावली जाते. हिंदू व बौद्ध धर्मांत ही त्रिमूर्तिकल्पना आढळते. ख्रिस्ती धर्मातील ⇨ट्रिनिटीची कल्पना मात्र या त्रिमूर्तिकल्पनेहून भिन्न आहे. ट्रिनिटीच्या कल्पनेत पिता, पुत्र व होली स्पिरिट (घोस्ट) मिळून एकच देव मानला आहे. बौद्ध धर्मातील महायान पंथात मंजुश्री, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांची त्रिमूर्ती मानलेली आहे. त्रिमूर्तिकल्पनेचे बीज वेदांतही […]
वीरगळ | Herostone
वीरगळ : युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. ‘वीराचा दगड’ ह्या अर्थाच्या ‘वीर-कल’ ह्या कन्नड शब्दावरून ‘वीरगळ’ हा शब्द आलेला आहे. वीरगळाला ‘वीराचा दगड’ किंवा केवळ ‘वीर’ म्हणूनही संबोधतात. ‘वीरगळां’ चा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला. कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या […]
शिल्पकला | Sculpture
शिल्पकला : (स्कल्पचर). शिल्प या संज्ञेचा अर्थ सामान्यपणे कौशल्यपूर्ण निर्मिती असा सर्वसमावेशक व म्हणून विविधार्थसूचक असल्याने तिच्या वापरात नेमकेपणा येण्यासाठी वास्तुशिल्प, काष्ठशिल्प, शब्दशिल्प, स्वरशिल्प, मूर्तिशिल्प यांसारख्या सामासिक शब्दांचा उपयोग करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला म्हणजे मूर्तिकला एवढ्या मर्यादित अर्थाने विवेचन केलेले आहे. शिल्पाविष्कार हा इंद्रियगोचर त्रिमित आविष्कार असल्याने त्याला पार्थिव अस्तित्व असते आणि वास्तव अवकाशावर […]
वीरगळ म्हणजे काय?
वीरगळ म्हणजे काय?- वीरगळ म्हणजे काय? तर युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणजे वीरगळ. वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू- वीरकळ- वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रुढ झाला. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात. इंग्रजीत वीरगळास Herostone असे संबोधतात. वीरगळ हा […]
भारतीय शिल्पकला (भाग-2)
अमरावती (धान्यकट्टा) शिल्प ही शैली अमरावतीमध्ये विकसित झाल्यामुळे तिला अमरावती शैली असे म्हणतात. अमरावती दक्षिण भारतात गुंटूर जिल्ह्याजवळ (आंध्र प्रदेश) कृष्णा नदीच्या खालच्या भागात स्थित आहे. ही शैली सातवाहन काळात (दुसरे शतक) आली. या शैलीत, धार्मिक विषयांवर शिल्पे तयार केली गेली आहेत आणि बहुतेक दगडी शिल्पे बनविली गेली आहेत. येथील दुसर्या पुतळ्यामध्ये बुद्ध वेडा हत्ती […]
भारतीय शिल्पकला (भाग-3)
पाषाणकालीन शिल्प बंगालचे पाल शासक बौद्ध अनुयायी होते, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत बौद्ध कलेला राजाश्रय मिळाला. पाल युगात बुद्ध, अवलोकितेश्वर, मैत्रेय, हरिती, बोधिसत्व, मंजुश्री, तारा इत्यादी मूर्ती बनवल्या गेल्या. पालशैलीत बनवलेल्या शिल्पांमध्ये विपुल भाव, अलंकार आणि वैशिष्ट्यांचे प्राबल्य हे घटक प्रभावीपणे दिसतात. पाल काळातील शिल्पकलेवर सारनाथ कलेचा प्रभाव मानला जातो, ज्याखाली प्रकाश, एकल शरीर आणि पारदर्शक […]
भारतीय शिल्पकला (भाग-4)
सुलतानी शिल्पकला मुस्लीम शासकांच्या काळात राज्यसंरक्षणाअभावी शिल्पकलेचा ऱ्हास झाला, पण तिचे अस्तित्व मात्र हरवले नाही. स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर कोणार्क, जगन्नाथपुरी, विजयनगर आणि तंजोर येथील पुतळे सल्तनत काळात निर्माण झाले. मुघल काळातील शिल्प मुघलांच्या काळातही शिल्पकला राज्याच्या संरक्षणापासून दूर असली तरी संगत्रासीचे काम सुरूच होते. अकबराच्या सहिष्णुतेमुळे आग्रा किल्ल्यातील झारोखा दर्शनाखाली जयमल आणि फट्टा यांच्या […]
भारतीय शिल्पकला (भाग-1)
प्राचीन जगात भारताला कलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान आहे. मानवी शरीराच्या भौतिक सौंदर्याचे चित्रण करण्यात यवन सर्वोच्च होते, तर इजिप्शियन लोक त्यांच्या पिरॅमिडच्या भव्यतेमध्ये आणि चिनी लोक निसर्गाच्या सौंदर्याचे चित्रण करण्यात अतुलनीय होते, तर भारतीयांनी त्यांचे अध्यात्म शिल्पांमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला होता; अध्यात्म ज्यामध्ये लोकांचे उच्च आदर्श आणि विश्वास समाविष्ट होते. अश्मयुगीन काळातही, मनुष्य कापणी किंवा दाबण्याच्या तंत्राने […]
आलिंगन,अद्वैताचे पहिले प्रतीक

आलिंगन, अद्वैताचे पहिले प्रतीक – आलिंगन या शब्दाला गळाभेट किंवा ऊरभेट असेही म्हणतात. अलिंगनाला अद्वैताचे पहिले प्रतीक मानण्याचे कारण म्हणजे कामशास्त्रानुसार दोन जीवांचे परस्पर मिलन यास आलिंगन असे म्हटले आहे. या दोघांच्या भेटीत जी ओढ, व्याकुळता आणि प्रेमभाव प्रकट करण्याची क्षमता आहे; ती पाहता हे दोन्ही जीव एकरूप झालेले असतात. म्हणूनच त्यास अद्वैत असे म्हटले […]
शोध – शीतला देवीचा

शोध – शीतला देवीचा – माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते. जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही […]
धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध

धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध – भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे […]
गुड्डीमल्लमचे शिवलिंग

गुड्डीमल्लमचे शिवलिंग – इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. लिंगाच्या समोर एक व्यक्ती उजव्या हातात शिंग असलेला प्राणी धरलेला असून डाव्या हातात कुंभ आणि परशु घरलेला आहे. मूर्ती पाच फूट उंचीची असून स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला […]