देवीची साडेतीन शक्तिपीठे
देवीची साडेतीन शक्तिपीठे – प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. शक्तिपीठांची दंतकथा याविषयी या पानाच्या शेवटी माहिती दिली आहे. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे […]
बारा खांडी दर्शन
बारा खांडी दर्शन – खांडी चा इतिहास खांडी पडलीया आणि आडी घातली ( उत्तरार्ध लीळा) लीळाचरित्रात आलेल्या या खांडी शब्दाचा अर्थ वेस , वेशीचे द्वार असा होतो . ‘ माहोर खांडी ‘ म्हणजे माहोर वेशीचे द्वार असा अर्थ होतो . तसेच खांडी या शब्दाचा अर्थ मार्ग ,रस्ता असाही होतो . माहोर खांडी म्हणजे माहूरला जाण्याचा मार्ग […]
रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती
रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती – समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे : ‘चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें […]
मल्हारगड | Malhargad
मल्हारगड | Malhargad – महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. काही किल्ले पुराणपुरुष म्हणुन प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्याच्या बांधकामासाठी प्रसिध्द आहेत. काही किल्ले शिवस्पर्शाने पावन झाले म्हणुन प्रसिध्द आहेत तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने प्रसिध्द आहेत. पण मल्हारगड मात्र वेगळ्याच कारणासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला […]
सरदार पानसे वाडा, सोनोरी
सरदार पानसे वाडा, सोनोरी – भीमराव सरदार पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगड किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी सरदार पानसे वाडा आहे.सोनोरी हे गाव सासवड पासून आठ ते दहा किमी अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावामध्ये असलेल्या सरदार पानसे […]
पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे समाधी
पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे समाधी – पिरंगुट हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून च गाव आहे. प्रियंगुवात किंवा प्रियवंतन चा अपभ्रंश होऊन पिरंगुट हे नाव पडले आहे. हिंदवी स्वराज्याचे पाहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचं गाव. नरवीर पिलाजी गोळे समाधी स्थळ आहे.गावात छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदीश्वर मंदिर देखणं आहे.छत्रपती […]
सोमेश्वर महादेव मंदिर, पाषाण
सोमेश्वर महादेव मंदिर, पाषाण – पाषाणचे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर मंदिर ७०० वर्ष जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार साक्षात जिजाबाई साहेबां हस्ते झालेला आहे. या सोमेश्वर मंदिरामागे, रामनदी काठी एक छानशी पुष्करणी देखील आहे. मंदिरात बारा ज्योतिर्लिंगातील एक एक मंदिराची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे, आणि मधोमध शंकर भगवान ची उभी मूर्ती प्रत्यक्ष […]
बनेश्वर मंदिर, नसरापूर
बनेश्वर मंदिर, नसरापूर – नानासाहेब पेशवे यांनी “शिवगंगा” नदीच्या तिरावर इसवीसन १७४९ मध्ये हे बनेश्वर मंदिर बांधून घेतले. त्यासाठी पेशव्यांना त्याकाळी ११,४२६ रूपये ८ आणे ६ पैशे इतका खर्च आला. बनेश्वर मंदिराचा सोपा तीन खणांचा असून त्यावर चोकोनी शिखर आहे. या सोप्यांच्या स्थंबावर कमळ पत्रांची नक्षी कोरलेली आहे. सोप्यातील मधल्य खणाच्या छताला एक मोठ्या आकाराची […]
हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर
हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर – पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील हजरत कमर अली दुर्वेश यांचा दर्गा हा देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाताे. मुस्लिम भाविकांसाेबतच हिंदूधर्मीय येथे दर्शनास येतात. तसेच श्रावण आणि आषाढ महिन्यात दर्ग्याच्या वतीने पाच पालख्यांची ग्रामफेरी केली जाते. भौगोलिक स्थान (Location) – पुणे मधील कात्रज पासून हजरत कमर अली […]
स्वराज्य स्तंभ, नसरापूर
स्वराज्य स्तंभ, नसरापूर – भोरला येताना वाटेत नसरापूर फाट्यावर थांबून तिथला भोरच्या संस्थानिकांनी बांधलेला स्वराज्य स्तंभ बघायलाच हवा. नसरापूर फाट्याच्या समोरच्या बाजूला कुंपण घातलेल्या प्रांगणात एक दगडी स्तंभ आहे. भोर संस्थांचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा स्वराज्य स्तंभ उभारला आहे. भौगोलिक स्थान (Location) – पुणे ते नसरापूर अंतर ४० […]
बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे
बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे – बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्य़ात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व सर्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर. इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. परंतु पर्यटकांपासुन वंचित राहिलेले एक मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर. हे खुप प्रचिन मंदिर असून त्याची सुंदरता आज पण टिकून पण […]
सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे समाधी
सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे समाधी, तळेगाव दाभाडे – शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या आणि लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही वीर लढाऊ एकमेव दाम्पत्य म्हणून नोंद झालेल्या श्रीमंत सरदार सरसेनापती खंडेराव आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. भौगोलिक स्थान (Location) – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून […]