काय आहे शिमगा सणाचे महत्त्व?
कोकणात शिमगा (Shimga) या नावाने ओळखला जाणारा होळी (Holi) हा कोकणातील सर्वात प्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन मासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी होळी पेटवून, तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून त्यात नारळाची आहुती देण्याची प्रथा आहे. तसेच पेटवलेल्या होळीला एकत्रित गलका करत हा सण साजरा केला जातो. […]
जत्रा | Fair
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे म्हणता येईल. इस्लामधर्मीय सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त जो उत्सव होतो, त्यास उरूस वा जुलूस म्हणतात. त्या त्या देवतेविषयी किंवा तीर्थक्षेत्रांतील एक वा अनेक देवतांविषयी पूज्यभाव वा सत्पुरुषाविषयी […]
नाग पंचमी, कला आणि सांस्कृतिक संदर्भ

नाग पंचमी, कला आणि सांस्कृतिक संदर्भ – भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका […]