पाहिले प्रवचन,बुद्ध,सारनाथ –
ज्ञानप्राप्तीच्या साधनेच्या काळात बुद्धांना त्यांचे पाच सहयोगी वाराणसीजवळच्या ऋषीपत्तनात रहात असल्याचे कळले होते. ज्ञानप्राप्तीच्यानंतर गौतम बुद्ध त्या ठिकाणी गेले. त्या पाचही सहयोग्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्कारले. तिथून जवळच असलेल्या सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी पाहिले प्रवचन दिले. जगातील दुःखांच्या मुळाशी असलेली ‘तृष्णा’ संपली म्हणजे दुःख नाहीसे होईल हा संदेश बुद्धांनी या प्रवचनातून दिला.
खालील शिल्प बुद्धांच्या पहिल्या प्रवाचनाचे असून, त्यांच्या एका हातात कमळ तर डावा हात भूमिस्पर्श मुद्रेत आहे. बुद्धांच्या आसनाखाली धम्मचक्र कोरलेलं आहे.