गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा गणपती बाप्पा. आजही आपल्याकडे गणपतीचे नाव घेऊन कामाची सुरुवात केली जाते. खरंतर फक्त महाराष्ट्रात,भारतात नाही तर जगभरात गणपतीच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात, मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. हे आठही गणपती स्वयंभू आहेत. या आठ गणपतींच्या स्थानांना मिळून अष्टविनायक म्हणलं जातं. या मंदिरांचे पुराणांतदेखील उल्लेख आढळतात. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात आहेत. याच अष्टविनायकाची आपण यात्रा करणार आहोत.
आपल्या यात्रेचा शुभारंभ होतोय पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आणि भीमा नदीच्या काठावर असलेल्या थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिरापासून. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी येथे गणेशाची उपासना केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.(मूर्तीचे जवळचे दृश्य) गणेशाची ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. त्यांच्या दोन्ही डोळ्यांत लाल मणी आणि हिरे आहेत. जवळून पाहिल्यावर ही मूर्ती अतिशय भव्य दिसते.थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला.यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.
आता आपण जात आहोत मोरगाव च्या मयूरेश्वराला. अष्टविनायक यात्रेतला पहिला गणपती.(मंदिराच्या बांधणीचे दृश्य दाखवा) या मंदिराचे बांधकाम बहामनी राजवटीदरम्यान झाले असे सांगितले जाते. (मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशिल्पाचे दृश्य दाखवा) हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मयूरेश्वर मंदिराच्या चार कोपऱ्यांवर बुरुज आणि उंच दगडी भिंती आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक मानले जाणारे चार दरवाजेही येथे आहेत. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. या गणेशाच्या मूर्तीला खास गोष्ट म्हणजे त्यावर चांदीचा मुलाम चढवलेला आहे.गणेशाची ही मूर्ती सुमारे चार फूट उंच आहे आणि त्यांच्या मस्तकावर मुकुट आहे.या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. या ठिकाणी श्रीगणेशाने सिंधू राक्षसाला मोरावर स्वर होऊन वध केला असे सांगितले जाते. म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. या मंदिराच्या प्रांगणात श्री सिद्धी आणि श्री बुद्धी यांच्याही मूर्ती आहेत. तसेच मंदिराच्या बाहेर गणेश प्रतिमेच्या सम्मुख एक काळ्या पाषाणातील मोठा नंदी आहे.ही एक असामान्य गोष्ट आहे. नंदी सामान्यतः शंकराच्या देवळासमोर असतो.
आता आपण जात आहोत सिद्धटेक ला. सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव भीमा नदीच्या काठावर असलेलं. (मंदिराच्या जुन्या बांधणीचे दृश्य दाखवा) या मंदिराचे बांधकाम 18 व्या शतकात झाले असे सांगितले जाते. मंदिराची वास्तुशैली हेमाडपंती असून ते खूपच भव्य दिसते. (मंदिराच्या आतील भागाचे दृश्य दाखवा) आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूंनी येथे गणेशाची उपासना केल्यावर त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यामुळे या गणपतीला सिद्धिविनायक असे म्हणतात. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. आपण रात्री विश्रांती घेऊ आणि उद्याच्या नव्या दिवसाची आणि येणाऱ्या अनुभवांची आतुरतेने वाट पाहू.
स्वागत आहे आपल्या अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या दिवसात! (आजच्या गंतव्यस्थानांची झलक दाखवा) आज आपण महागणपती, ओझर आणि लेण्याद्री या ठिकाणांना भेट देणार आहोत. (कथन) आपल्या यात्रा सुरुवात होतेय, श्री महागणपतीच्या दर्शनाने. हे मंदिर ९-१०व्या शतकातील असल्याचे मानले जाते. (मंदिराच्या बांधणीचे दृश्य दाखवा) मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे.येथील गणपतीची मूर्ती महोत्कट या नावानेही ओळखली जाते. एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेशमूर्ती परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपवून ठेवण्यात आली आहे.हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडी आणि २० हात आहेत. या मूर्तीला ‘महोत्कट’ म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.
आपला पुढील टप्पा आहे ओझर. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना याच ठिकाणी श्रीगणेशाने त्याचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते.या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत.पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत.
आता आपण जाणार आहोत लेण्याद्रीच्या सुंदर डोंगरांमध्ये वसलेल्या श्री गणेशाच्या दर्शनासाठी. गिरिजात्मज म्हणजे गिरिजाचा आत्मज म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र म्हणजेच श्रीगणेश होय. (गुहांमधील मंदिराचे दृश्य दाखवा) येथील गणेश मंदिर हे एका गुहेत आहे. (मूर्तीचे जवळचे दृश्य दाखवा) या गुहेमध्ये गणेशाची एक उभी आणि एक बसलेली अशा दोन स्वयंभू मूर्ती आहेत. (दर्शनाचा अनुभव सांगा) गुहेच्या आतल्या वातावरणामुळे येथील दर्शन खास आणि अविस्मरणीय ठरते. (गुहेची जुन्या वास्तुशिल्पाची दृश्ये दाखवा) या लेण्यांचा इतिहास खूप प्राचीन असून त्यांचे सातवाहन काळाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कापून बांधण्यात आले आहे.
रायगडच्या महाड मध्ये वरदविनायक मंदिर आहे. एका मान्यतेनुसार वरदविनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याचीही एक आख्यायिका आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंड तेवत आहे.
रायगड येथील पाली गावातील या मंदिराचे नाव बल्लाळ या गणेशभक्ताच्या नावावरून आहे. बल्लाळच्या आख्यायिकेबद्दल असे म्हटले जाते की या परम भक्ताला त्याच्या श्रीगणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने गणेशमूर्तीसह जंगलात सोडले होते. जिथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता. यावर प्रसन्न होऊन श्रीगणेशाने त्याला या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधले गेले.
अष्ट विनायक यात्रा कां करतात? Reel Content
“आपल्याला माहिती आहेच अष्टविनायक मध्ये आठ गणपती येतात. हा आठ अंक आठ प्रकारच्या प्रकृतीशी जोडला गेला आहे. या अष्ट प्रकृती कोणत्या – पृथ्वी, वायू, जल, आकाश, अग्नी, चित्त, बुध्दी आणि अहंकार. मग एका महापुरुषांनी सुचवले कि हरेक प्रकृतीसाठी एकेक गणपतीची स्थापना केली जावी. पुरातन काळामध्ये समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा तो एक प्रयत्न होता. कारण त्याकाळी थोड्या थोड्या अंतरावर, दर ६०० कि.मी. अंतरामध्ये एक नवी भाषा, एक नवी संस्कृती,नवीन राहणीमान पाहायला मिळणे साधारण गोष्ट होती. उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, सर्वत्र काहीही समान नव्हते. तेंव्हा देशात, समाजामध्ये एकी कशी निर्माण करावी? अश्यावेळी सांगितले जायचे, १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करा, रामेश्वरला जा, काशीला जा, त्र्यंबकेश्वर इत्यादीला जा. अश्या प्रकारे भ्रमण केल्याने, तीर्थयात्रा केल्याने देशात एकी निर्माण होण्यास मदत होत होती. हेच कारण आहे. अश्याच प्रकारे अष्ट विनायक आहेत. मुख्य विचारधारा हीच होती कि महाराष्ट्रभर लोक प्रवास करतील तेंव्हा तीर्थयात्रेचे फळ मिळेलच. तसेच एकमेकांना भेटून, जाणून घेऊन आपापसात जोडले जातील. त्याकाळी वेगळ्या सुट्टीची प्रथा नसल्याने तीर्थयात्रेलाच प्रवास, पर्यटन समजले जायचे. कारण हे धार्मिक, पवित्र कार्य होते. म्हणून वेगवेगळी मंदिरे निर्माण केली गेली. आणि लोकांनाही वाटायचे कि अवश्य तेथे जावे आणि दर्शन घ्यावे.”
थेऊर Reel Content
प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता. त्यांच्या पत्नीचे नाव गुणवती होते. राजाला मूलबाळ नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषींच्या आज्ञेवरून राजा-राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे गुणवंतीला मुलगा झाला. त्याचे नाव गणासूर असे ठेवले. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वान्नाचे जेवण खाऊ घातले. गणासुराला ते रत्न हवे होते, पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार दिला. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले. त्यांनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवीने ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. श्रीगणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले. श्रीगणेशाने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले. ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेंव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती “चिंतामणी विनायक” म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेही म्हणतात.
चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात त्यांच्या अखेरच्या दिवसांत वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले. त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.
मोरगाव Reel Content
प्राचीन काळी गंडकीवर चक्रपाणी नावाच्या महान राजाचे राज्य होते. सूर्याची उपासना करून त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू असे ठेवले. सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्व प्राप्त केले. अमरत्व प्राप्त झाल्यावर सिंधूची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याला फक्त त्रैलोक्याचे राज्य मिळवायचे होते. मग त्याने पृथ्वी जिंकली. त्याने इंद्राच्या अमरावतीवर हल्ला केला. इंद्राचा सहज पराभव झाला. त्याने स्वर्ग काबीज केला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता आला नाही. सिंधूने त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने विष्णूला वश करून गंडकीमध्ये राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक आणि कैलासवरही आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्व देवतांना गंडकीत कैद केले. मग सर्व देवतांनी गणेशाची आराधना सुरू केली. प्रसन्न होऊन गणेशाने देवतांना आश्वस्त केले. मी मयुरेश्वराच्या नावाने देवी पार्वतीच्या पोटी अवतार घेईन आणि तुम्हाला सिंधूच्या दुःखातून मुक्त करीन. सिंधूच्या त्रासाला कंटाळून शंकर मेरू पर्वतावर पार्वतीसोबत राहत होते. नंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेशाची पूजा करत असताना गणेशाची मूर्ती जिवंत झाली. त्याने मुलाचे रूप धारण केले आणि पार्वतीला म्हणाला, “आई, मी तुझा मुलगा झालो आहे.”.त्यानंतर श्रीगणेश आणि सिंधू यांच्यात प्रचंड युद्ध झाले. श्रीगणेश एका मोठ्या मोरावर बसला आणि युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले गेले. कमलासुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे मोरगाव परिसर. तेव्हा गणेशाने सिंधू राजाचा पराभव करून सर्व देवांना मुक्त केले. तेथेच गणेशभक्तांनी विनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मोरावर बसलेल्या गणेशाने राक्षसाचा वध केला म्हणून याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात आणि त्या जागेला मोरगाव असे नाव पडले.
सिद्धटेक Reel Content
प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की, आपण सृष्टी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी श्रीगणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली. गणेशाने त्यांना एकाक्षरी मंत्र दिला होता. ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्येने श्रीगणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ‘तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.’ मग देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे दोन राक्षस जन्माला आले. त्यांनी ब्रह्मदेवाचा छळ सुरू केला. संपूर्ण पृथ्वी हादरली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना जागे केले. विष्णू आणि मधु-कटभ यांच्यात घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध झाले तरी विष्णू त्या राक्षसांचा वध करू शकले नाहीत. म्हणून ते भगवान महादेवांकडे गेले. युद्धाच्या सुरुवातीला तू गणेशाची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. त्यानंतर विष्णू एका पवित्र टेकडीवर आले. तेथे त्यांनी ‘श्री गणेशाय नमः’ या सहा अक्षरी मंत्राने श्रीगणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाले. विनायकाच्या कृपेने भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली. मग त्यांनी मधु-कैटभाचा वध केला. विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोठे मंदिर बांधले आणि त्यात गंडकिशिलाच्या विनायकाची मूर्ती बसवली. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले, म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला ‘श्रीसिद्धिविनायक’ असे म्हणतात.
रांजणगाव Reel Content
प्राचीन काळी ग्रीत्समद नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परम भक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. “मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवीन,” असे तो मुलगा म्हणाला. मग ऋषींनी त्याला “गणानां त्वां’ हा गणेशमंत्र सांगितला. मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची तीन नगरे दिली. ‘भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही. भगवान शिव एका बाणाने या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल. असा वर दिला. श्रीगणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासूराला मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुरस मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले; पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, ‘युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोकोत्तम स्तोत्र ‘प्रणाम्य शिरसा देवं” सांगितले.. त्या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि ‘मी गणेश आहे’ असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवांनी त्रिपुरासुरवर विजय मिळावा असा वर मागितला. तेव्हा श्रीगणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून श्रीगणेश अदृश्य झाले. त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासूरचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती आहे.
ओझर Reel Content
प्राचीन काळी हेमावती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद मिळावे, असा विचार तो करू लागला. ही बातमी इंद्राला नारदमुनींकडून स्वर्गात समजली होती. तो घाबरला. त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्यावेळी ते असुर रूपात प्रकटले. इंद्राने त्यांना आज्ञा केली, ‘अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर, त्याचा यज्ञ नष्ट कर. त्याने परवानगी मिळवून केवळ यज्ञच नष्ट केला नाही तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्मांचा नाश केला. धर्म नाहीसा झाला. ही मोठी संकटे देवतांवर आली. मग सर्व देवांनी गजाननाची पूजा केली. त्यावेळी गजानन पराशर मुनींच्या आश्रमात राहत होते. देवतांच्या पूजेने गजानन प्रसन्न झाले. त्त्यांनी देवांना आश्वासन दिले की ‘मी तुमचे रक्षण करेन. त्यानंतर गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला त्याने विघ्नसुराशी मोठे युद्ध केले. गजाननाच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नसूर हरला व त्याने शरणागती पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ‘ज्या ठिकाणी माझे भजन-पूजा-कीर्तन होत आहे तेथे तू जाऊ नकोस.’ तेव्हा विघ्नसुराने गजाननाला विचारले, ‘तुझ्या नावामागे माझे नाव असावे. या भागाला ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नाव द्यावे. तेव्हा गजानन म्हणाला, “मी आजपासून ‘विघ्नेश्वर’ झालो आहे..’विघ्नेश्वर’ नामाचा जप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.” त्यामुळे या ठिकाणी गजाननाला ‘विघ्नेश्वर’ किंवा ‘विघ्नहर’ हे नाव पडले. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझरमध्ये घडली. हेच ओझरचे ‘श्री विघ्नेश्वर विनायक’ मंदिर होय.
लेण्याद्री Reel Content
गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्षे तप केले. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईन आणि तुझ्या इच्छा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. पार्वतीने भाद्रपद चतुर्थीला गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. मूर्ती जिवंत झाली आणि पार्वतीपुढे पुत्ररूपात प्रकट झाली. गजाननाला सहा हात, तीन डोळे आणि सुंदर शरीर होते.
गिरिजात्मज गणेशाने या परिसरात 12 वर्षे तपश्चर्या केली. अगदी लहान वयातच त्याने राक्षसांचा वध करून सर्वांना अत्याचारातून मुक्त केले. या परिसरात गौतममुनींनी गणेशाची पूजा केली. या प्रदेशात श्रीगणेशाने ‘मयुरेश्वर’ अवतार घेतला असे म्हणतात. या परिसरात गिरिजात्मज गणेशाचे वास्तव्य सुमारे 15 वर्षे होते. त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो.
महाड Reel Content
प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला. मुलबाळ नसल्याने तो दु:खी होता. मग तो आपल्या राणीसह जंगलात गेला. त्याचे दु:ख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. तेव्हा राजाने घोर तपश्चर्या केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. “लवकरच तुला मुलगा होईल,” त्याने राजाला सांगितले. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवले. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी जंगलात भटकत असताना तो वाचकन्वी ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्या प्रेमात पडली पण पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे मुकुंदाने रुक्मांगदाला ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा शाप दिला. शाप मिळाल्यानंतर सोन्यासारखे चमकणारे रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी होऊन रुक्मांगद जंगलात भटकत असताना नारदमुनींना भेटला. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरीच्या कदंब मंदिरात स्नान केले आणि तेथे चिंतामणी गणेशाची पूजा केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.
इकडे मुकुंदा रुक्मांगदाच्या प्रेमात झुरू लागली. तेव्हा मुकुंदाची येथील स्थिती पाहून इंद्राने रुक्मांगदाचे रूप धारण करून मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदाला मुलगा झाला. त्याचे नाव ग्रीत्सम्द असे ठेवले. ग्रीत्सम्दाला आपल्या जन्माचे सत्य समजले तसेच त्याच्या जन्माची कहाणी सर्वांनाच ठाऊक होती. परिणामी, तो हळूहळू अपमानित होऊ लागला. आईच्या पापामुळे सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागले. त्यानंतर ग्रीत्सम्दाने त्याच्या आईला शाप दिला. त्यानंतर त्याने प्रायश्चित्तासाठी पुष्पक (भद्रक) वनात तपश्चर्या सुरू केली. त्याने विनायकाची पूजा केली. त्यामुळे श्रीगणेश प्रसन्न झाले. श्रीगणेशाने त्यास वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही या वनात राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा.” ते पुष्पक किंवा भद्रक जंगल म्हणजे आजचा महाड प्रदेश. येथील विनायकाला ‘वरदविनायक’ असे म्हणतात
पाली Reel Content
प्राचीन काळी, कल्याण नावाचा व्यापारी सिंधू खोऱ्यातील कोकण पल्लीर (पाली गाव) नावाच्या गावात राहत होता. त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती होते. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ ठेवले. बल्लाळ जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा गणेशमूर्ती पूजेकडे कल अधिकच दिसू लागला. हळूहळू तो गणेशाचे ध्यान करू लागला. त्याचे मित्रही गणेशभक्तीत वेडे झाले. बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात गेला आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करू लागला. बल्लाळाने मुलांचा छळ केल्याची चर्चा गावात सुरू झाली. लोक कल्याणशेठजींकडे गेले आणि ‘बल्लाळने आमची मुलं बिघडवली’ अशी तक्रार करू लागले.
आपल्या मुलाने एवढ्या लहान वयात भक्तीमार्गाला सुरुवात करून इतर मुलांनाही त्याच मार्गाला लावले याचा राग कल्याणशेठजींना होता. संतप्त होऊन ते एक मोठी काठी घेऊन बल्लाळ होता त्या जंगलात गेले. तेथे बल्लाळ आपल्या साथीदारांसह गणेशमूर्तीची पूजा करत होता. सर्वजण गणेशाचा जप करत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात लीन झाला होता. ते पाहून कल्याणशेठजींच्या पायाची आग मस्तकात गेली. ते ओरडत आणि शिव्या देत तिथे गेले. त्यांनी ती पूजा मोडली. गणेशमूर्ती फेकून देण्यात आली. बाकीची मुले घाबरून पळून गेली; पण बल्लाळ गणेश ध्यानात लीन होता. कल्याण सेठजींनी बल्लाळला काठीने मारहाण केली. बल्लाळ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला झाडाला बांधले. कल्याणशेठ रागाने म्हणाला, ‘तुझा गणेश आता तुला वाचवायला आला पाहिजे. तू घरी आलास तर तुला मारून टाकीन. तुझे माझ्याशी असलेले नाते कायमचे तुटले आहे.’ असे म्हणून कल्याणशेठ निघून गेले.
काही वेळाने बल्लाळ शुद्धीवर आला. त्याचे शरीर थरथरत होते. त्याच अवस्थेत तो गणेशाकडे धावला आणि त्याने प्रार्थना केली की, “भगवान, तू विघ्नहर्ता आहेस. तू तुझ्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीस… ज्याने कोणी गणेशाची मूर्ती फेकून मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका आणि कुष्ठरोगी होईल. मी आता तुझा विचार करतच मरेन.” बल्लाळची प्रार्थना ऐकून विनायक-गणेश ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले. बल्लाळचे बंधन तुटले. त्याचे शरीर तेजस्वी झाले. गणेश बल्लाळला म्हणाला, “ज्याने तुला त्रास दिला आहे, त्याला या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही खूप त्रास सहन करावा लागेल.” तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझा भक्त, महान गुरु आणि दीर्घायुष्याचा प्रवर्तक होशील. आता तुला काय हवे ते माग.” तेव्हा बल्लाळ म्हणाला- “तुम्ही नेहमी या ठिकाणी राहून तुमच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून ओळखली जावी. तेव्हा गणेश म्हणाले – “तुझ्या इच्छेनुसार मी येथे ‘बल्लाळ विनायक’ या नावाने सदैव वास करीन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.” तीच मूर्ती आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते.
Reel Content –
गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.
Reel Content –
गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं. अजून एक कथा म्हणजे महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला 10 दिवस महाभारताची कथा ऐकवली आणि गणपती ती कथा लिहू लागले. 10 दिवसांनी जेव्हा महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला हात लावला तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूपच वाढलेलं होतं. व्यासांनी गणपतीला पाण्याच्या कुंडात नेऊन त्यांच्या शरीराचे तापमान कमी केले. यानंतर गणेश विसर्जनाची परंपरा सुरू झाली.